Mumbai crime news Saam TV Marathi
मुंबई/पुणे

Mumbai Crime : संसाराचा भयंकर शेवट, मध्यरात्री १ वाजता बेडरूममध्ये नवऱ्याने केलं भयंकर कृत्य, पत्नीचा मृत्यू होताच...

Mumbai crime news : मालाडच्या कुरार गावात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Malad Crime: मालाड (पूर्व) येथील कुरार गाव परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या छातीवर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. सुचिता आकाश साळुंखे (वय २९) असे मृत महिलेचे नाव असून, त्या एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये (प्रयोगशाळा) नोकरी करत होत्या. घटनेनंतर पत्नीला रुग्णालयात दाखल करून आरोपी पती आकाश साळुंखे तिथून फरार झाला असून, कुरार पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुचिता आणि आकाश हे कुरार गावातील तानाजी नगर येथील शिवसागर सोसायटीत राहत होते. त्यांचा प्रेमविवाह झाला असून त्यांना चार वर्षांचे एक बाळ आहे. आरोपी आकाश हा बेरोजगार असून तो मद्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनाधीन होता.

सुचिता आणि आकाश यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच आकाश सुचिता यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. रविवारी पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यावर संतापलेल्या आकाशने स्वयंपाकघरातील चाकूने सुचिता यांच्या छातीवर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात सुचिता गंभीर जखमी झाल्या.

घटनेनंतर सुचिता यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून आकाशने मित्रांच्या मदतीने त्यांना कांदिवली (पश्चिम) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती सुचिता यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

पत्नीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच आरोपी आकाशने रुग्णालयातून काढता पाय घेतला व तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

या प्रकरणी कुरार पोलिसांनी 'भारतीय न्याय संहिता' (BNS) मधील संबंधित कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे नेमके कारण, दोघांमधील वादाची पार्श्वभूमी आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT