Mahim beach Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News: धुलीवंदनाच्या दिवशी माहीम समुद्रात ५ जण बुडाले

Mumbai Mahim News in marathi : मुंबईच्या माहीममधून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईतील माहीम समुद्रात ५ जण बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या ४ जणांना वाचविण्यात यश आलं आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर, मुंबई

Mumbai Mahim News :

मुंबईच्या माहीममधून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईतील माहीम समुद्रात ५ जण बुडाल्याची घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या ४ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. मात्र, यातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर एका बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे. सर्व तरुण कॉलेजमधील विद्यार्थी आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, धुलीवंदनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थी मुंबईतील माहीम समुद्र किनाऱ्यावर आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थी पोहण्यासाठी समुद्रात गेले. मात्र, समुद्रात गेलेल्या या पाच विद्यार्थ्यांचा तोल गेला. यामुळे पाचही विद्यार्थी समुद्रात बुडाले.

या घटनेची माहिती मिळताच समुद्रात बुडालेल्या पाच पैकी ४ जणांना वाचविण्यात यश आलं. त्यातील २ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आलं. तर दोघांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील हर्ष किंजले नावाच्या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर होती. याच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांपैकी पाचवा विद्यार्थी यश कागडा नावाच्या तरुणाचा शोध सुरु आहे. यश बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यात 13 लाख 80 हजार किमतीचं ड्रग्ज'चं जप्त

Brain tumor symptoms: सततच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांनी सांगितली काय आहेत ब्रेन ट्युमरची लक्षणं

Kidney Health: किडनी फेल होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या

Bigg Boss Marathi 6 Winner: बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव फिनालेपूर्वीच लीक; 'हा' स्पर्धक जिंकणार ट्रॉफी!

SSC-HSC Result 2026: दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT