Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : मुंबई लोकलचा खोळंबा, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांची कसरत

Mumbai local train delay : पश्चिम रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईकर चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ, रेल्वे प्रशासनावर नाराजी.

Namdeo Kumbhar

Mumbai local Churchgate slow local delay : गुरुवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्या तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. विशेषतः चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई लोकल उशीराने धावत असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

सकाळच्या गर्दीची वेळ, ऑफिसला जायची लगबग, त्यात लोकल उशीरा धावत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना होत आहे. मुंबई लोकल ही प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. पण गर्दीच्या वेळीच खोळंबा उडाल्याने नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळीच मुंबई लोकल विस्कळीत झाली. त्यामुळे अनेकांना कामावर पोहोचण्यासाठी प्रचंड उशीर झाला.

काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नाराजी व्यक्त केली, तर काहींना नाईलाजाने रिक्षा किंवा बसचा पर्याय निवडावा लागला. पश्चिम रेल्वेने तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशीराने धावत असल्याचे समोर आले आहे. लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT