Mumbai Local Update Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Update: मध्य रेल्वे उशिरा धावणार, ठाणे रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड

मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. यामुळे रेल्वे पटरीवर पाणी साचले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा धावणार आहे. ठाण्याच्या स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला आहे. ठाण्यातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. तर ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांनाही उशिर लागत आहे. पाण्याचा निचरा करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे, पण पाऊस मुसळधार सुरू असल्याने पुन्हा पाणी साठा होत आहे.

आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाणे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल बंद झाली. सध्या प्रशासनाकडून लोकल बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर स्लो ट्रॅक सुरू होईल, याला अजून काही वेळ लागू शकतो. दरम्यान, ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेल्या बिघाडामुळे कळवा, मुंब्रा अशा स्थानकात देखील मध्य रेल्वेच्या धीम्या ट्रॅकवरील लोकल खोळंबल्या आहेत.

तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे आणि अंधेरीत बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले,आणि सांताक्रुज दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच पुन्हा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील पाहा

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे (Rain) आता धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्याचबरोबर नद्यांची पाणीपातळीही वाढत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट पाच इंच एवढी झाली आहे. नदीचे पाणी कोल्हापूर शहराजवळ पात्राबाहेर गेल आहे. पावसाची रिपरिप अशीच राहिली तर आज रात्री उशिरापर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळीवर म्हणजेच ३९ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. (Kolhapur Rain Updates Today)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कुंभी कासारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोगे -कुडित्रे पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावर मयत गवा रेडा अडकला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने विद्यार्थी आणि नोकरदारांची अडचण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT