Mumbai Local Train News Today Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट, रेल्वेच्या 'या' मार्गावर विशेष ब्लॉक; अनेक लोकल राहणार बंद

Mumbai Local Train News : ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या उशिराने धावणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Satish Daud

मुंबई : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वेकडून आज शनिवारी (ता. १९) आणि उद्या रविवारी (ता. २०) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या उशिराने धावणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कसारा स्थानकात शनिवारी मध्यरात्री ३:२० वाजेपासून ते रविवारी मध्यरात्री १:२० मिनिटांपर्यंत तब्बल २२ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकमुळे २२ लोकल ट्रेन नजीकच्या स्थानकापर्यंतच धावतील. यासोबतच कर्नाक बंदर पुलाच्या उभारणीसाठी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते साडेतीन ब्लॉक घेण्यात येईल.

ब्लॉकचा लोकल सेवेवर असा होईल परिणाम

ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा शनिवारी मध्यरात्री साडेबारा ते साडेतीन वाजेदरम्यान वडाळा, भायखळा रोडपासून सीएसएमटी स्थानकापर्यंत बंद राहतील. तसेच मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील ८ लोकलसेवा रद्द होतील. वसई रोड भिवंडी रोड आणि ठाणे स्थानकादरम्यान वळवलेल्या सर्व गाड्यांसाठी दोन मिनिटांचा अतिरिक्त थांबा मिळेल.

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक राहणार बंद

हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असेल. परिणामी सीएसएमटीहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीसाठी जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून कुर्ला आणि पनवेल- वाशी या मार्गांवर विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सायंकाळी १० ते ६ या कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी आहे. दरम्यान, मध्य रेल्वेवरील शनिवार मध्यरात्री १२.३० ते पहाटे रविवार पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकलसेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विशेष म्हणजे या गाड्या कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाही. तसेच कल्याणहून सकाळी ३.२३ आणि ३.५७ वाजता सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या देखील ठाकुर्ली व कोपर स्थानकांवर थांबणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

SCROLL FOR NEXT