Mumbai Local Train Traffic Changes Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : लोकलच्या वाहतुकीत मोठे फेरबदल होणार, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा होणार!

Satish Daud

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या वाहतुकीत आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी केली जात आहे. ही मार्गिका टाकायचा निर्णय झाल्यास मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचा मोठा खोळंबा होणार आहे. हार्बर मार्गावरील लोकलचा प्रवास सँडहर्स्ट रोडलाच संपणार आहे.

तर मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व फास्ट लोकल ट्रेन भायखळ्यात थांबणार नाहीत. अर्थातच याबाबत अजूनही निर्णय होणे बाकी आहे. मात्र, एका रेल्वे अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकल ट्रेनची (Mumbai Local Train) ओळख आहे. दररोज लोकलने लाखो प्रवासी प्रवास करतात.

मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं असल्यास लोकल ट्रेनचा प्रवास सुखकर ठरतो. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. त्यातच लोकलच्या फेऱ्या वाढवूनही प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

हीच बाब लक्षात घेता, मध्य रेल्वे CSMT आणि परळ दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका सुरू करण्याचा विचार करीत आहेत. जर हा निर्णय घेण्यात आला, तर नवीन CSMT-परळ मार्गिकेसाठी हार्बर रेल्वेचे प्लॅटफॉर्म आणि CSMT तसेच मस्जिद स्थानकादरम्यान ट्रॅकची आवश्यकता भासणार आहे.

त्यामुळे रेल्वे सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाइन सेवा बंद केली जाण्याची शक्यता आहे. नवीन ट्रॅक तयार करण्यासाठी भायखळा येथील फास्ट ट्रॅकवरील प्लॅटफॉर्म मध्य रेल्वेकडून बंद केली जाणार आहे. तसे झाल्यास फास्ट लोकल गाड्या कुर्लानंतर फक्त दादर आणि सीएसएमटी स्थानकावर थांबतील.

त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागू शकतो. कारण, हार्बरचा शेवटचा थांबा सँडहर्स्ट रोडपर्यंतच असणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासना या मार्गिकेचे काम नेमके कधी सुरू करणार याकडे संपूर्ण नवी मुंबईकरांचं लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस,अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता पोलिसांकडून बंद

Pune Ganesh Visarjan: गणपती विसर्जनाला गालबोट! पुण्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Aaradhya Bachchan: आराध्याला ट्रोल करणाऱ्यांनो 'हा' व्हिडीओ पाहाच; बच्चन कुटुंबियाची मुलगी कशी दिसतेय?

IND vs BAN, 1st Test: विराट-रोहित ६-६, गिल ०, तासभरातच टॉप ऑर्डर कोसळली, बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज पडला भारी

Maharashtra Politics : भाजपमध्ये हालचाली, अमित शाह येण्याआधी फडणवीसांकडून उमेदवारांची चाचपणी

SCROLL FOR NEXT