Mumbai Local Mega Block harbour line  Saam tv
मुंबई/पुणे

Mega Block News : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडताय? उद्या हार्बर, पश्चिम मार्गावर 'मेगाब्लॉक', जाणून घ्या वेळापत्रक

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Mega Block News : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच रविवारी पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेवरील रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Breaking Marathi News)

रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या (९ एप्रिल) मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. (Latest Marathi News)

उद्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार असून या कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल तसेच बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा देखील बंद राहतील.

उद्या मुख्य मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसेल

दुसरीकडे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसेल. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला स्थानकादरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी तसेच नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील.

रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर (Mumbai Local Train) देखील रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत हा मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. काही बोरिवली लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT