Local Train Stunt Saam Tv
मुंबई/पुणे

Local Train Stunt: टवाळखोर स्टंटबाजाला जन्माची अद्दल; धावत्या लोकलला लटकून स्टंटबाजी भोवली

Tanmay Tillu

मुंबईतील हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या दारात लटकून शिवडी रेल्वे स्थानकात स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये तरुण धावत्या लोकल ट्रेनच्या दाराला लटकून प्लॅटफॉर्मवर स्टंटबाजी करत होता. मात्र त्याला या स्टंटबाजीनं जन्माची अद्दल घडलीये. या तरुणानं आधी काय पराक्रम केलेत ते पाहूया.

बघा लोकल प्लॅटफॉर्मवरुन निघते. हा तरुणही दरवाजात उभा राहतो. दाराला पकडतो. गाडीचा वेग वाढतो तसा हा तरुण एक पाय वर घेत दुसऱ्या पायानं स्केटींग करतो. डब्यातले इतर प्रवासी त्याला असं करु नको सांगतायत. बघा. गाडीनं बऱ्यापैकी वेग पकडला तरी तरुणाची स्टंटबाजी काही थांबत नाही.अखेर प्लॅटफॉर्म संपण्याआधी तरुण दाराला लटकतो.

पाहिलंत का स्टंटबाजांनो. हुल्लडबाजी,स्टंट करुन जन्माची अद्दल कशी घडते. या दोन्ही व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणाचं नाव फरहत आझा शेख आहे. तो वडाळ्यातील अँटॉप हिलमध्ये राहतो. फरहत आता नीट चालुही शकत नाही. दरम्यान याबाबत मध्य रेल्वेनं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन केलंय.

मध्य रेल्वेचं आवाहन

जीवावर बेतेल असा प्रवास करू नका

लोकलने प्रवास करताना आपली काळजी घ्या

इतरांनाही स्टंटबाजी करण्यापासून रोखा

प्रवाशांनी 9004410735 या क्रमांकावर गैरकृत्यांची तक्रार करा

लोकल ट्रेनमधील टवाळखोरांची स्टंटबाजी नवी नाही. त्यातल्या त्यात हार्बर रेल्वे मार्गावर तर अशा टवाळखोरांची सुळसुळाट आहे. अशा स्टंटबाजांसमोर आता फरहतचं जीवंत उदाहरण आहे. त्याकडे बघून तरी स्टंटबाजी कमी होईल अशी आशा आहे. नाहीतर स्टंटबाजांनो तुमचा फरहत व्हायला वेळ लागणार नाही, त्यामुळे वेळीच सुधरा. जीव वाचवा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT