woman fell from local train in Kalyan saam tv
मुंबई/पुणे

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

24-Year-Old Woman Falls On Railway Tracks: ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून अचानक रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या 24 वर्षीय तरुणीचे रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखत प्राण वाचवले. गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

रात्रीच्या सुमारास लोकलमधून अचानक रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या 24 वर्षीय तरुणीचे रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान राखत प्राण वाचवले. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. सुदैवाने लोकल सिग्नलमुळे थांबलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. उल्हासनगर येथील प्रीती संजय पाल या कामावरून घरी परतत होत्या. लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान सिग्नलमुळे थांबलेली असताना अचानक चक्कर आल्याने त्या लोकलमधून खाली रेल्वे ट्रॅकवर पडल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली.

दरम्यान, कचोरे परिसरात गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याचवेळी ट्रॅकवर तरुणी पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणीला ट्रॅकवरून सुरक्षित बाहेर काढले.

यानंतर जखमी तरुणीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांची सतर्कता आणि प्रसंगावधानामुळे एका तरुणीचे प्राण वाचले असून, या घटनेत मोठा अनर्थ टळला.

दरम्यान आंबिवली रेल्वे फाटकाजवळ 20435 प्रयागराज एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्धा तास थांबली. पेंटोग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एक्सप्रेस जागीच थांबल्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. एक्सप्रेस गाडी बराच वेळ थांबल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत बिघाड दूर केला आणि प्रयागराज एक्सप्रेस मार्गस्थ केली. रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 6.20 ते 6.30 वाजण्याच्या सुमारास प्रयागराज एक्सप्रेसच्या पेंटोग्राफमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही अडचण दूर करून गाडी मार्गी लावण्यात आली आहे. तसेच डाऊन मार्गावरील लोकल सेवाही पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्फोटात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

दुष्काळात बळीराजाला मोठा दिलासा! लग्नाचा खर्च उचलणार शिवसेना; शिंदेंनी थेट दिला 'हा' शब्द

प्रेमानंद महाराजांच्या शिष्यानं उचललं टोकाचं पाऊल; गुप्तांगाला जखम अन् खोलीत ग्राइंडर आढळल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT