Mumbra Kalwa train disruption News Saam TV News
मुंबई/पुणे

कल्याण फास्ट लोकलने रेड्याला उडवलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अनेक गाड्या उशिराने

Mumbai local train delay : मुंब्रा आणि कळवा दरम्यान फास्ट लोकलने रेड्याला धडक दिल्याने मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. अपघातामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, लोकल सेवा ३० मिनिटे ठप्प होती.

Namdeo Kumbhar

Mumbra Kalwa train disruption News : कल्याण फास्ट लोकलने रेड्याला उडवल्यामुळे मुंबई लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान आज सकाळी एका रेड्याने लोकल ट्रेनने धडक दिली, रेड्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल ट्रेन सेवा पूर्णपणे खोळंबली.

कल्याण फास्ट लोकलने एका रेडाला टक्कर दिली. या धडकेमुळे रेड्याचा जागीच मृत्यू झाला आणि लोकलच्या चाकाला चिकटला त्यामुळे वाहतूक खोळंबली. ही घटना सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ही मार्गिका बंद ठेवण्यात आली असून सर्व वाहतुक स्लो मार्गावर वळवण्यात आली आहे. मयत रेड्याला बाजूला काढण्यात आले असून रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या अपघातामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि कल्याण दरम्यानच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या दुर्घटनेमुळे ट्रेन सेवा सुमारे ३० मिनिटे ठप्प झाली. अनेक गाड्या २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेडा रुळांवर आल्याने ट्रेनला अचानक थांबावे लागले. मुंब्रा-कळवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारी १२:१५ वाजता लोकल सेवा पूर्ववत झाली. अनेक लोकल उशीराने धावत आहे. या खोळंब्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर रेल्वे प्रशासनावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT