Mumbai Local Train Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; भल्यापहाटे मुंबईकरांची तारांबळ

Mumbai Local Train Latest News: हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

Mumbai Local Train Latest News: मुंबईकरासांठी एक मोठी बातमी समोर आली आहे. हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबई ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावणाऱ्या लोकल तब्बल १० मिनिटं उशीराने धावत आहेत. तर काही लोकल ट्रेनच्या फेऱ्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

भल्यापहाटे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वेकडून लोकलची वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलची ओळख आहे. दररोज हजारो मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून लोकलसेवा सुरळीत ठेवण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून केलं जातं.

मात्र, कधी-कधी तांत्रिक कारणामुळे लोकलसेवा खोळंबली जाते. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांची मोठी तारांबळ उडते. बुधवारी पहाटेच्या सुमारास कामावर निघालेल्या चाकरमान्यांसोबत असाच प्रकार घडला.

हार्बर मार्गावरून धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रेन रूळावरच बंद पडली. त्यामुळे पनवेलकडून-सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला. या मार्गावरील लोकल सेवा उशीराने सुरू होती. तर काही लोकल फेऱ्या रद्द देखील करण्यात आल्या.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : मुंबईला आज पुन्हा रेड अलर्ट

Teacher Salary: गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांचे पगार रखडणार, सरकारने वेतन का अडवले? वाचा

Pune Rain Flood : पिंपरी-चिंचवडमध्ये कोसळधारा, अनेक ठिकाणी पूरस्थिती, ६०० हून अधिक कुटुंबीय स्थलांतरित

Moong Dal Bhaji: रिमझिम पावसात घरीच बनवा गरमा गरम मूग भजी; १० मिनिटांत होईल रेसिपी

Monsoon Foot Infection: पावसाच्या पाण्यामुळे पायांना चिखल्या झाल्यास घरगुती उपाय काय करावे?

SCROLL FOR NEXT