Mumbai Local Train News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; अखेर कर्नाक पूल पाडला, मध्य रेल्वेची वाहतूक सुरू

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील कर्नाक पूल पाडण्याचं काम पूर्ण झालं आहे.

Satish Daud

Mumbai Local Train News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील कर्नाक पूल पाडण्याचं काम पूर्ण झालं आहे. तब्बल ४ क्रेनच्या सहाय्याने हा पूल १०० टक्के पाडण्यात आला आहे. त्यामुळे १७ तासानंतर आता मध्य रेल्वेची (Mumbai) वाहतूक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मुंबईतील कर्नाक पूल पाडण्यासाठी शनिवारी रात्री ११ वाजेपासून ब्लॉक घेण्यात आला होता. (Mumbai News Today)

मुंबईतील कर्नाक पूल इंग्रजांच्या काळात म्हणजेच १८६७ साली बांधण्यात आला होता. २०१८ साली कर्नाक पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यानंतर त्याच्या तोडकामाची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पूल पाडण्यासाठी लागणारा वेळ तसेच विविध कामासाठी शनिवारी रात्री ११ वाजेपासून मेगाब्लॉग घेण्यात आला.

त्यासाठी सीएसएमटीकडे जाणाऱ्या मेन, हार्बर आणि मेल एक्सप्रेस गाड्या (Local Train) रद्द करण्यात आल्या होत्या. या ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी कोडी झाली होती. काल म्हणजेच शनिवारी रात्रीपासून कर्नाक पूल पाडण्याचं काम सुरू झालं होतं. तब्बल १७ तासानंतर ४ क्रेनच्या सहाय्याने हा पूल पाडण्यात आला आहे.

आता ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम सुरू असून रेल्वे प्रशासनाने तयारी केल्याप्रमाणे ४ वाजेपर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाक पूल पाडण्यासाठी ३५० वजनी क्षमता असलेल्या ४ क्रेन, ५० गॅस कटर आणि ३०० गॅस सिलेंडरचा वापर या पाडकामासाठी २०० कर्मचारी, पुलाखाली ओएचई विभागाचे १५० असे एकूण ४०० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत हे काम पूर्ण केले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

२०२७ चा वर्ल्डकप खेळणार, ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्माने मराठीत चिमुकल्या फॅन्सला दिलं आश्वासन

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT