Mumbai Local Train Mobile Phone Thief Shocking Video Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: ती लोकलची वाट पाहत उभी, तो दबक्या पावलांनी आला अन्... धक्कादायक VIDEO

Mumbai Local Train Mobile Phone Thief Shocking Video: मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Mumbai Local Train Mobile Phone Thief Shocking Video: मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात. म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेकजण मोबाईल चोरी जाणार नाही, याची काळजी घेत असतो.

पण भाईंदर यावेळी चोरट्याने लोकलमधून नाही, तर लोकल स्थानकावर मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या एका तरुणीच्या हातातून मोबाईल हिसकावून पोबारा केला. चोरट्याने केला हा प्रताप स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून रेल्वे पोलिसांनी चोरट्याचा शोध घेत त्याला अटक सुद्धा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर रेल्वे (Mumbai Local Train) स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3/4 वर एक 18 वर्षीय विद्यार्थिनी आपल्या कॉलेजला जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होती. तेव्हा काळी पॅन्ट, काळा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती ट्रेनमधून बाहेर आला. आपल्याकडे कुणाचंही लक्ष नाही आणि बाहेर गर्दी आहे, याचा फायदा घेऊन त्याने तरुणीच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढला.

अचानक मोबाईल घेऊन पळ काढल्यामुळे तरुणीने तिचा पाठलाग केला पण तोपर्यंत पळून गेला होता. हा संपूर्ण प्रकार रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर तरुणीने वसई रोड लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन चोरीचा गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला. त्यानंतर आरोपी संजूकुमार प्रजापती याला सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे वसईतील भोयदापाडा येथून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजू कुमार चोरीचा मोबाईल स्वत: वापरत होता. सध्या पोलिसांनी चोरीचा मोबाईल जप्त केला आहे. तसंच चोरट्यालाही अटक करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? हे घरगुती उपाय करा

SCROLL FOR NEXT