Mumbai Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कुठे, कधी, कसा? जाणून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Mega Block update: मुंबईत रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mega Block On Sunday Time Table

मुंबईत रविवारी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी(ता.७)एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत.(Latest Marathi News)

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर रेल्वेच्या ठाणे ते वाशी मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही माहीम ते अंधेरीदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्य रेल्वे- मुख्य मार्ग

मार्ग- अप डाउन धीमा

कुठे- माटुंगा ते मुलुंड

वेळ- सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

या ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येईल.यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द तर काही रेल्वे फेऱ्या उशिराने धावणार आहेत.

हार्बल रेल्वे मार्ग

मार्ग- अप आणि डाउन

कुठे- ठाणे ते वाशी आणि नेरुळ

वेळ- सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

या ब्लॉक कालावधीत ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी आणि नेरुळ आणि ठाणे ते नेरुळ- पनवेल अप डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

मार्ग- अप आणि डाउन

कुठे- माहीम ते अंधेरी

वेळ- सकाळी ११ ते दुपारी ४

या ब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वांद्रे - सीएसएमटी तर सीएसएमटी -गोरेगाव - सीएसएमटी मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तर काही लोकल फेऱ्या चर्चगेट ते गोरेगाव ही रद्द राहणार आहेत.

सहा दिवस रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील घाटकोपर ते भांडुपदरम्यान विक्रोळी उड्डाणपूलाचे गर्डर उभारण्यासाठी काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने सहा दिवसांचा रात्रकालीन विशेष ट्रॅफिक ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारी ६ एप्रिल मध्यरात्री ते गुरुवार ११ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.

शनिवारी मध्यरात्री १.२० ते पहाटे ४.०५ पर्यंत तर उर्वरित पाच दिवस मध्यरात्री तीन तास ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकमुळे रात्री उशिराच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT