Mumbai Local News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: तळपत्या उन्हात मुंबईकरांचा होणार खोळंबा, उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकल रद्द?

Mumbai Mega Block Updates: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, उद्या म्हणजेच रविवारी (ता.१२) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

Satish Daud

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, उद्या म्हणजेच रविवारी (ता.१२) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आलंय.

रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान CSMT येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत वाशी, बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येतील. विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकांत लोकल थांबणार नाहीत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT