Mumbai Local Train Mega Block Saam Tv Digital
मुंबई/पुणे

Mumbai Local: ठाणे- कळवा धीम्या मार्गावर ३६ तासांचा इंफ्रास्ट्रक्चर ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: ठाणे-दिवा ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेच्या संबंधात नवीन टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट व कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी, मध्य रेल्वे ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर ३६ तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक (Mega Block) परिचालीत करणार आहे. आज दि. ८.१.२०२२ (शनिवार) रोजी दुपारी २.०० ते दि. १०.१.२०२२ (सोमवार) च्या मध्यरात्री २.०० वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गांवर हा असणार आहे. (Mumbai Local: Thane - kalwa a 36-hour Infrastructure block news)

हे देखील पहा -

या ब्लॉक दरम्यान केली जाणारी कामे:

या ब्लॉक दरम्यान, ठाणे ते विटावा रोड दरम्यान पुलाखालील नवीन टाकलेला ट्रॅक कट करून सध्याच्या डाउन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल. त्याचप्रमाणे क्रॉसओवर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगच्या संदर्भात रुळावरील डिरेलींग स्विच तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व चालू करण्याची कामे ब्लॉक कालावधीत केली जातील. ७ टॉवर वॅगन, ३ युनिमॅट/ड्युओमॅटिक मशीन, २ डिझेल मल्टी लोको, एक बॅलास्ट रेक, १ डीबीकेएम इत्यादींचा वापर अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामांसाठी केला जाईल.

या सर्व कामांमुळे ट्रेन (Mumbai Local Train) खालीलप्रमाणे चालविण्यात येतील:

दि. ८.१.२०२२ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून दुपारी २.०० वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद सेवा कल्याण ते माटुंगा दरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा, नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत पुढे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

दुपारी २.०० नंतर अप धिमी/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानी निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.

दि. ८.१.२०२२ रोजी दुपारी १२.५४ ते १.५२ वाजेपर्यंत दादरहून सुटणाऱ्या धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर, कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.

दुपारी २.०० नंतर, डाउन धिम्या/अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत आणि निर्धारित वेळेच्या १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून चढणाऱ्या प्रवाशांना अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका अधिकाऱ्यांशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था केली आहे. संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवलीतून सुटणाऱ्या/टर्मिनेट होणारी उपनगरीय सेवा उपलब्ध नसतील. ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा येथील जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.

उपनगरीय सेवा दि. १०.१.२०२२ (सोमवार) रोजी वेळापत्रकानुसार चालतील

मेल/एक्स्प्रेस सेवा:

दि. ७.१.२०२२ आणि ८.१.२०२२ (शुक्रवार आणि शनिवार) रोजी सुटणाऱ्या एक्सप्रेस खालील गाड्या रद्द -

12112 अमरावती- मुंबई एक्सप्रेस

12140 नागपूर -मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

दि. ८.१.२०२२ आणि दि. ९.१.२०२२ (शनिवार आणि रविवार) रोजी सुटणा-या एक्सप्रेस गाड्यांचा प्रवास रद्द -

11007 / 11008 मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस

12071 / 12072 मुंबई-जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस

12109 /12110 मुंबई- मनमाड- मुंबई पंचवटी एक्सप्रेस

11401 मुंबई- आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस

12123 /12124 मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन

12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस

12139 मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

11139 मुंबई - गदग एक्सप्रेस

17612 मुंबई- नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

दि. ९.१.२०२२ आणि १०.१.२०२२ (रविवार आणि सोमवार) रोजी सुटणा-या एक्सप्रेस गाड्या रद्द -

11402 आदिलाबाद- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

11140 गदग -मुंबई एक्सप्रेस

पुणे येथे एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

17317 हुबळ्ळी-दादर एक्सप्रेस दि. ७.१.२०२२ आणि ८.१.२०२२ रोजी सुटणा-या

11030 कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस दि. ८.१.२०२२ आणि ९.१.२०२२ रोजी सुटणा-या

पुण्याहून एक्स्प्रेस गाड्यांची शॉर्ट ओरिजिनेशन -

11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस दि. ९.१.२०२२ आणि १०.१.२०२२ रोजी सुटणारी. 17318 दादर- हुबळ्ळी एक्सप्रेस दि. ८.१.२०२२ आणि ९.१.२०२२ रोजी रोजी सुटणारी. (Mumbai Local Train Updates News in Marathi)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT