मुंबई लोकलमधील वाढत्या गैरप्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय.
काही घटनांनंतर रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
लाखो मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधील सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
मुंबईची लाईफलाईन, आता प्रवाशांसाठी थेट डेथ लाईन ठरतेय.. होय, ऐकून धक्का बसला ना? पण हाच अंगावर काटा आणणारा मृत्यूचा थरार आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. काळजावर दगड ठेवा आणि स्क्रीनवर नीट पाहा. ही दृश्यं तुम्हाला जरुर विचलित करतील, तुमचा थरकाप उडवतील. आणि मुंबई लोकलच्या सुरक्षेचा बुरखा टराटरा फाडतील.
घटना क्रमांक 1
अंबरनाथ लोकल
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा तरुण पाहा. गुन्हा काय? तर फक्त लगेज डब्यात झोपण्यावरून झालेला वाद. पण याच वादातून प्रीतेश नावाच्या नराधमानं हातातील लोखंडी कड्याने राजू आणि साहिल या दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला केला. हल्ला इतका अमानुष होता की दोघेही मृत्यूशी झुंज देत रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेतायेत. लोकलचा डबा की कसाईखाना? असा प्रश्न पडावा, इतकी भयानक ही घटना आहे.
लोकलच्या डब्यात दोन प्रवाशांमधील वादाचं पर्यावसान कसं राड्यात झालं ते पाहा. ही दृश्यं फक्त बघू नका, तर कान देऊन ऐका. एक गुंड प्रवाशांना बेदम मारहाण करताना ओरडतोय, मशीन काढ, मशीन काढ. होय. ही मशीन म्हणजे गुंडांच्या भाषेत थेट बंदूक. मुंबईच्या लोकलमध्ये आता थेट बंदुकांची भाषा सुरू झालीये. कायद्याची कायद्याची लक्तरं
घटना क्रमांक तीन
कुर्ला स्टेशन, फलाट क्रमांक 1
हातात धारदार कोयता घेऊन हा माथेफिरू भर स्टेशनवर मोकाट पळत सुटलाय. प्रवाशांना अर्वाच्च शिव्या देत, हा गुंड कुर्ला स्टेशनवर दहशत माजवत होता, लोकं घाबरुन बाजूला जात होते. संतापजनक बाब म्हणजे, याच फलाटावर रेल्वे पोलिसांची चौकी आहे, स्टेशन मास्तरचं ऑफिस आहे.पण कायद्याची भितीच नसलेल्या या गुंडांची मस्ती पोलिसांच्या नाकाखाली सुरू होती.
हा चेहरा नीट पाहा, आठवतोय ना? गेल्याच महिन्यात फर्स्ट क्लासच्या डब्यात कोयत्याने झालेल्या हल्ल्यात याच मयांक लोहारचा बळी गेला होता.. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या मोठमोठ्या बाता मारल्या. मात्र महिन्याभरातच 15 जुलैच्या मध्यरात्री ठाकुर्लीत घडलेल्या या घटनेनं रेल्वे पोलीस झोपलेले असून प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय. रेल्वेनं मात्र यावेळीही आपलं ठरलेलं उत्तर दिलंय.
मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेत आज कोण कधी कोयता काढेल कोण कधी मशीन काढेल आणि सामान्य प्रवाशांचा गेम होईल, हे सांगता येत नाही. सुरक्षेच्या नावाखाली सामान्य करदात्यांचे हजारो कोटी रुपये हे GRP, हायटेक CCTV आणि मेटल डिटेक्टरवर उडवले जातात. पण प्रवाशांच्या नशिबी मात्र फक्त मरण किंवा मरणयातनाच येतात. रोजच रेल्वेच्या डब्यात पडणाऱ्या रक्ताच्या सड्याचं कोणालाच सोयरं सुतक नाही..फलाटावर झोपलेल्या भिकाऱ्य़ांना काठ्यांनी तुडवणारे पोलीस सर्रास कोयते नाचवणाऱ्या गुंडांना पाहून कोणत्या बिळात लपून बसतात? हा प्रश्न लोकल प्रवाशांना पडलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.