Csmt to Panvel  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत; पनवेल ते CSMT दरम्यान तांत्रिक बिघाड

Mumbai Local Train update : हार्बर रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. हार्बर मार्गावरील पनवेल ते सीएसएमटीदरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. पनवेल आणि सीएसएमटीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिट उशिरा सुरु आहेत. पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान हा बिघाड झाला आहे. केबलमध्ये बिघाड झाल्याने अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेवर परिणाम झाला आहे. या तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवास करणाऱ्या मोठा फटका बसला आहे. ऐन संध्याकाळच्या वेळेत रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

नेमकं काय घडलं?

हार्बर रेल्वे मागील काही वेळापासून उशिराने धावत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकाजवळ केबलमध्ये बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. केबलमध्ये बिघाड झाल्याने पनवेल-सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर याचा परिणाम झाला आहे. या मार्गावरील प्रवाशांची स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे.

या मार्गावरील वाहतूक तब्बल 15 ते 20 मिनिट उशिराने रेल्वे धावत आहेत. मध्य रेल्वेचे कर्मचारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत. त्यामुळे काही वेळात हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाहतूक सुरळीत झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

SCROLL FOR NEXT