Mumbai Train Fight Video saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये सीटवरुन वाद, प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी; घटनेचा Video व्हायरल

Local Train Fight Video : लोकल ट्रेनच्या हार्बर मार्गिकेवर एका ट्रेनमध्ये सीटवरुन दोन प्रवाशांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ही घटना सानपाडा स्टेशनदरम्यान घडली.

Yash Shirke

  • नवी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये सीटवरून प्रवाशांमध्ये हाणामारी झाली.

  • पनवेल-सीएसएमटी लोकलमधील ही घटना सानपाडा स्टेशनदरम्यान घडली.

  • हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

विकास मिरगणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Mumbai Train Fight Video : मध्य, पश्चिम किंवा हार्बर.. लोकल ट्रेनच्या तिन्ही मार्गांवर प्रवाशांना नेहमीच गर्दीचा सामना करावा लागतो. ऑफिस, कॉलेजच्या वेळांमध्ये लोकल ट्रेनमध्ये सर्वात जास्त गर्दी असते. अशा वेळी ट्रेनमध्ये नीट उभं राहायला नीट जागाही नसते. अशा वेळी ट्रेनमध्ये जागेवर, उभं राहण्यावरुन वाद, भांडण होत असल्याचे पाहायला मिळते. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे.

नवी मुंबईत पुन्हा एकदा लोकल ट्रेनमध्ये प्रवासी सीटसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रवाशांमध्ये सीटसाठी हाणामारी देखील झाली. ही हाणामारीची घटना हार्बर मार्गावरील पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये सानपाडा स्टेशनदरम्यान घडली आहे. या हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सानपाडा स्टेशनदरम्यान पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये सीटसाठी झालेल्या वादात प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. हाणामारीदरम्यान शिवीगाळ झाल्याचेही व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. सीटवर बसण्यावरुन झालेल्या वादाचे रुपांतर मराठी विरुद्ध अमराठी वादात होण्याची शक्यता होती. पण सहप्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

ठाणे-वाशी लोकलमध्येही हाणामारी

ठाणे-वाशी दरम्यान टान्स हार्बर मार्गावर एका लोकल ट्रेनमध्ये हाणामारी झाली. दोन प्रवाशांमध्ये ट्रेनमधील सीटवरुन झालेल्या बाचाबाचीमधून फ्री स्टाईल हाणामारी झाली. या दोघांचा वाद लोकल ट्रेनमधील सहप्रवाशांनी मिटवून दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रवासी हाणामारी करत असल्याचे दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला साई भक्ताच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न चोरट्याला बेदम चोप

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

Maharashtra Politics : भाजपला मोठा झटका बसणार? अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Honeymoon Destinations in India: लोणावळा खंडाळा... कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडरचा खात्मा

SCROLL FOR NEXT