Local Train Accident Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Accident: बापरे! धावत्या लोकलचे झाले दोन भाग; पश्चिम रेल्वेवर विचित्र अपघात

Mumbai Local Broke Into Two Parts: सर्व स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

Ruchika Jadhav

Mumbai Local Train Accident:

मुंबई सेंट्रल स्थानकात झालेल्या डीरेलमेंटनंतर पश्चिम रेल्वेत आणखीन एक मोठा अपघात झाला आहे. लोकल ट्रेनचे कपलर तुटल्याने ट्रेन २ भागांत विभागली गेलीये. ही घटना सकाळी मरीन लाइन्स स्थानकात घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघात झालेली लोकल चर्चगेटवरुन बोरिवलीला जाणारी होती. सकाळी ११ च्या सुमारास लोकल ट्रेन मरीन लाइन्स स्थानकात पोहचली होती. अशी विचित्र घटना झाल्याने प्रवासी गोधळले, सर्व प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या लोकलने जाण्यास सांगण्यात आले. आतमधून तुटलेल्या लोकलचे दोन्ही भाग कारशेडमध्ये नेण्यात येत आहेत. सर्व स्लो मार्गावरील लोकल फास्ट मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आणि लोकलचा वेग कमी असल्याने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघातात लोकलचे डबे एकमेकांपासून वेगळे झाले. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यानंतर लोकलचे वेगळे झालेले डबे आता रुळावरून हटवण्यात आल्यानंतर रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत झालीये. यापूर्वी लोकलचा असा अपघात 2003 मध्ये झाला होता.

अपघाताच्या या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला जातोय. दर रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक घेतला जातो. यावेळी ट्रेन देखील कमी सोडल्या जातात. त्यावेळी मेगाब्लॉक असताना ट्रेनचं मेन्टेंन्स केलं जात नाही का? असा प्रश्न उपस्थित राहिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT