Mumbai Local Video  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये पुरूष प्रवाशाकडून महिलेला मारहाण, मुंबईतील धक्कादायक प्रकार; पाहा संजापजनक VIDEO

Mumbai News: मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. धावत्या लोकलमध्ये महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली. पुरूष प्रवाशाने महिलेला बेल्टने मारहाण केली.

Priya More
  • मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण

  • पुरुष प्रवाशाकडून महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली

  • सीटवरून वाद झाल्यानंतर घडली घटना

  • संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांवर जीवघेणा हल्ल्यापासून ते हत्या करण्यापर्यंतच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच मुंबई लोकलमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पुरूष प्रवाशाने महिला प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. कमरेचा बेल्ट काढून या प्रवाशाने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई लोकलमध्ये पुरुष प्रवशाकडून महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे. कोणत्या मार्गावरील आणि कोणत्या लोकलमध्ये हा प्रकार घडला याची माहिती समोर आली नाही. लोकलच्या जनरल कोचमध्ये हा प्रकार घडला. बसण्याववरून या दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. संतापलेल्या पुरूष प्रवाशाने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याने बेल्ट काढून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. एक दोन वेळा या प्रवाशाने महिलेला हाताने मारहाण देखील केल्याचे समजते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोकलच्या डब्यामध्ये एक महिला बसली आहे आणि तिच्यासोबत एक पुरूष प्रवासी जोरजोरात भांडण करत आहे. हा प्रवासी महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो. ही महिला सुरुवातीला सीटवर झोपली होती त्यामुळे बसण्यावरून पुरूष प्रवासी तिच्यासोबत वाद घालतो. महिला देखील या प्रवासाला जशाच तसे उत्तर देत होती. पण अंगावर धावून धावून पुरूष प्रवाशी महिलेला धमकावतो.

हा वाद इतका विकोपाला जातो की पुरूष प्रवासी तिला शिवीगाळ करत तिच्यावर हात उचलतो. हा संपूर्ण प्रकार लोकलमधील इतर प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. धक्कादायक बाब म्हणजे आपसाप इतर प्रवासी असताना देखील कुणीच त्या प्रवाशाला रोखले नाही आणि महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्यात दंग होते. लोकलमधील इतर प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नेटकरी संतप्त झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

Farmer Success Story : वावरची पॉवर! शेतकरी महिलेची भरारी; शेतीतून लाखोंची कमाई, यशाची त्रिसूत्री, प्रवास वाचून थक्क व्हाल!

राज्यात बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश, 5 लाखांत कोणत्याही विद्यापीठाची डिग्री

50 लाखांत विकला MPSCचा पेपर, गौरवचा प्रेमभंग, पेपरफुटीचं फुटलं बिंग

Morning walk : रोज झटपट पटापट चालता, पण वजन काही कमी होत नाही; तुम्ही या 5 चुका करत नाहीत ना?

SCROLL FOR NEXT