mega block  Saam tv
मुंबई/पुणे

रेल्वे प्रवाशांचा शनिवारी-रविवारी खोळंबा होणार; महत्वाच्या कामासाठी पॉवरब्लॉकची घोषणा, कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

Sunday mega block : रेल्वे प्रवाशांचा शनिवारी-रविवारी खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेने रविवारी पॉवरब्लॉकची घोषणा केली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे पादचारी उड्डाणपूलाच्या गर्डर लाँचिगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषणा करण्यात आली आहे. या पॉवरब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेद्वारे कांजूरमार्ग रेल्वे स्थानक कल्याण बाजूच्या दिशेने कि.मी. २४/१३–१४ दरम्यान पादचारी उड्डाणपूलासाठी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर, रोड क्रेनच्या सहाय्याने लाँच करण्यात येणार आहे. यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून शनिवार 14-2-2026 ते रविवार 15-2-2026 मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पॉवर ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांवरील परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ठाणे लोकल (T-1) १५.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. .तर ठाणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल (T-2) १५.०२.२०२६ रोजी ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत रेल्वे स्थानक लोकल (S-1) १५.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी गाडी माटुंगा रेल्वे स्थानक ते मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान डाउन जलद मार्गावरून वळविण्यात येईल. ही लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे थांबणार नाही. त्यामुळे तिन्ही स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या स्टेशनवर उतरावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मिल्कशेक मर्डर! बॉयफ्रेंडच्या प्रेमात आंधळी झाली पोलीस मुलगी; जन्मदात्या बापाला संपवलं, हादरवणारा प्लान उघड

Maharashtra Live News : कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं

Live-in Relationship: विवाहित पुरूषही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात, पण...; हायकोर्टानं नेमकं काय सांगितलं? वाचा

Mumbai Police : मुंबईत खाकीला डाग! पोलीस शिपाईच बनले चोर, २ जणांनी केली १० लाखांची चोरी

Kairi Chutney Recipe : आंबट-गोड कैरी अन् वाटीभर खोबरं; १० मिनिटांत बनवा चटणी, एक घास खातच येईल कोकणची आठवण

SCROLL FOR NEXT