Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! बोरिवली पुढेही धावणार लोकल, एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्गिका, काय आहे नेमका प्लॅन ? वाचा

Mumbai Western Railway News : बोरीवली–विरारदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेचे १८ टक्के काम पूर्ण झाले आहे. जमीन अधिग्रहण, पर्यावरण मंजुरी आणि नवीन पुलांच्या कामाला वेग मिळत असून प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

बोरीवली–विरार पाचवी आणि सहावी मार्गिका प्रकल्पाचे १८% काम पूर्ण

जमीन अधिग्रहण आणि पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया वेगाने सुरू

वसई खाडीवरील दोन नवीन पुलांचे बांधकाम प्रकल्पात समाविष्ट

प्रकल्पामुळे उपनगरी गर्दी कमी होऊन रेल्वे प्रवास अधिक सुकर होणार

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बोरीवली आणि विरार स्टेशनदरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्यात येत असून या प्रकल्पाचे काम १८ टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे बोरीवलीच्या पुढेही लोकल आणि मेल-एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका मिळणार असल्याने प्रवासी वाहतूक कार्यक्षमता वाढवण्यास मदत मिळणार आहे.

उर्वरित जमीन अधिग्रहणाचे कामदेखील जलदगतीने करण्यात येत असून, या टप्प्याचे काम एमयूटीपी प्रकल्पांतर्गत सुरू आहे. ११२६ पश्चिम रेल्वेमार्फत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. सध्या खार आणि कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार आहे, तर विस्तारीकरण वर्षअखेरपर्यंत बोरीवलीपर्यंत करण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यातील काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत सुरू आहे.

या प्रकल्पासाठी खासगी जमीन मिळविण्याच्या प्रक्रियेत १.८१ हेक्टरपैकी १.४० हेक्टरचा ताबा आधीच मिळाला आहे, तर उर्वरित जमीन कायदेशीर प्रक्रियेत आहे. ०.६७ हेक्टर सरकारी जमीन प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली आहे. सुमारे १३.६२ हेक्टर खारफुटी क्षेत्राचे संपादनही सुरू असून टप्प्याटप्याने मंजुरी मिळत आहे. पर्यावरण मंत्रालयाकडून टप्पा-१ आणि टप्पा-२ वन मंजुरी मिळाली आहे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाने खारफुटी क्षेत्रात काम करण्यास परवानगी दिल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

बोरीवली-विरार प्रकल्पासाठी २ हजार १८४ कोटी रुपये खर्च येणार १ आहे. तो राज्य आणि केंद्र शासन उचलणार. पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि उपनगरी व लांब पल्ल्याच्या वाहतुकीचे विभाजन करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. प्रकल्पामध्ये भाईंदर आणि नायगाव स्थानकांदरम्यानच्या खाडीवर दोन महत्त्वाच्या पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. वसई खाडीवर हे पूल असणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या प्रकल्पामुळे बोरिवली आणि विरारच्या प्रवाशांना सुसज्ज प्रवास करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईतील नेव्हल डॉकयार्डवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, आंध्र प्रदेशमधून आला फोन

Akon Video: धक्कादायक! भर कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाची टवाळखोरानी काढली पॅन्ट, VIDEO व्हायरल

Diabetes Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कांदा खाणं योग्य? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Relationship Tips: पार्टनरकडे या गोष्टी सुद्धा मागाव्या लागतायत? तर हेच आहेत ब्रेकअपचे संकेत

Shocking News : "तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात..." जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, नाशिकमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT