saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसाचा पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे जाणून घ्या

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी २३-२४ एप्रिल २०२६ रोजी टिटवाळा आणि वासिंद दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे सेवांवर परिणाम होणार आहे.

Bharat Jadhav

  • टिटवाळा ते वासिंद दरम्यान ब्लॉक

  • २३-२४ एप्रिल मध्यरात्री काम होणार

  • प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करावा

मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा आणि वासिंद स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला येणार आहे. दिनांक २३/२४.०४.२०२६ रोजी च्या मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १५ डब्यांच्या रेकच्या उभारणीसाठीच्या कामाकरिता हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

टिटवाळा आणि खडवली स्थानकांवरील नवीन पॉईंट्सचे ओएचई (OHE) चालवण्यासाठी आणि अतिक्रमण हटवण्याचे काम करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दिनांक २३/२४.०४.२०२६ रोजीच्या मध्यरात्री टिटवाळा आणि वासिंद स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे.

ब्लॉकची तारीख: दिनांक २३/२४.०४.२०२६ (गुरुवार/शुक्रवारची रात्र)

ब्लॉकचा कालावधी: दिनांक २४.०४.२०२६ रोजी ०२.१० ते ०३.२५.

ब्लॉक विभाग: अप आणि डाउन मार्गावर टिटवाळा (सहित) ते वासिंद (वगळून).

ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे असतील:

दिनांक २४.०४.२०२६ रोजी पहाटे ०२.२७ ते ०३.२५ वाजेपर्यंत खालील गाड्यांचे नियमन केले जाईल.

• गाडी क्रमांक 12102 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्सप्रेस वासिंद येथे नियमित केली जाईल.

* गाडी क्रमांक 18030 शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आसनगाव येथे नियमित केली जाईल.

* गाडी क्रमांक 12810 हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आटगाव येथे नियमित केली जाईल.

* गाडी क्रमांक 12132 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस खर्डी येथे नियमित केली जाईल.

* गाडी क्रमांक 20104 भटणी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कसारा येथे नियमित केली जाईल.

* गाडी क्रमांक 01026 बलिया - दादर एक्सप्रेस इगतपुरी येथे योग्य वेळी नियमित केली जाईल.

पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असल्याचं रेल्वे प्रवक्त्यांनी आपल्या निवदेन पत्रकात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT