Virar Dahanu Local Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पश्चिम रेल्वेवर डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल धावणार; या दिवशी सुरु होणार सेवा

Virar-Dahanu Local 15 Coach Extended: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल धावणार आहे. या महिन्याअखेरीस ही सेवा सुरु होऊ शकते.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

विरार-डहाणू १५ डब्यांची लोकल धावणार

विरार स्थानकाच्या विस्ताराचे काम पूर्ण

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पश्चिम रेल्वेवर १५ डब्ब्यांची लोकल धावणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर १५ डब्यांच्या लोकलची वाट पाहत आहे. आता ही लोकल लवकरच सुरु होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे.

पश्चिम रेल्वेच्या विरार स्थानकातील फलाटाच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता १५ डब्ब्यांची लोकल सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महिन्याअखेरीस ही ट्रेन सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही लोकल सुरु झाल्याने गर्दी कमी होणार आहे.

विरार स्थानकावरील फलाटाच्या रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विरार स्थानकावरील काम पूर्ण झाल्यानंतर आता १५ डब्ब्यांची लोकल सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एमआरव्हीसी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सुरक्षेसह वाहतुकीत कमीत कमी अडथळा निर्माण करत काम पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांनाच फायदा होणार आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनीही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या फेऱ्या वाढवण्यावर भर दिला आहे. १९ मार्चला एकूण १५ डबा असलेल्या लोकलच्या १६ फेऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. आता पुढे डहाणूपर्यंत ही सेवा सुरु होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर नेहमी गर्दी पाहायला मिळतात. रोज हजारो लोक विरार-वसईवरुन अप डाउन करतात. पश्चिम रेल्वेच्या लोकल खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच लोकलचे डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी आता फलाटाचेही रुंदीकरण करावे लागत आहे. त्यातील काही काम पूर्ण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT