Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य-पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना नवरात्रीत देवी पावणार, नवीन रेल्वे वेळापत्रक तयार; प्रवास गर्दीमुक्त होणार

Priya More

नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये रेल्वे प्रशासन मुंबईकरांसाठी नवे वेळापत्रक लागू करणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आता गर्दीमुक्त आणि सुसाट होणार आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना विस्तारित लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा पर्यंय असेल. तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना नवीन लोकल ट्रेनने प्रवास करण्याचा पर्याय असेल. मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय गाड्यांसाठी नवे वेळापत्रक तयार करण्यात आलेले असून त्याची अंमलबजावणी येत्या ५ ऑक्टोबरपासून म्हणजेच शनिवारपासून होणार आहे.

दादरवरून सुटणार ११ जलद लोकल -

सीएसएमटी स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी दादर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर काम सुरू करण्यात आले. दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक ११ चा वापर वाढवण्यासाठी सीएसएमटीहून धावणाऱ्या ११ जलद लोकल आता दादर स्थानकावरून धावणार आहेत. त्याचवेळी दादरपर्यंत धावणाऱ्या २४ लोकल गाड्या परळपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील निला यांनी सांगितले की, 'सुधारित वेळापत्रकानुसार दादर रेल्वे स्थानकावर गर्दी कमी होईल आणि परळ टर्मिनसचाही चांगला वापर केला जाईल.'

मुंब्रा आणि कळव्याला जलद लोकल थांबणार -

महत्वाचे म्हणजे, गर्दीच्या वेळी मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकावर जलद लोकल गाड्यांना थांबा देण्याची मागणी नव्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी, जलद लोकल कळवा येथे सकाळी ८:५६ वाजता आणि मुंब्रा येथे ९:२३ वाजता थांबतील. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी, जलद लोकल गाड्या कळवा येथे ७:२९ वाजता आणि मुंब्रा येथे ७:४७ वाजता थांबतील. या निर्णयामुळे मुंब्रा आणि कळव्याच्या प्रवाशांना दोन नवीन जलद लोकल उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर १२ नवीन लोकल -

१२ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर नवीन वेळापत्रक लागू झाल्यानंतर प्रवाशांना १२ नवीन लोकल ट्रेनची सेवा मिळणार आहेत. यासोबतच १२ डब्यांच्या १० लोकल ट्रेनचा १५ डब्यांपर्यंत विस्तार केला जाईल आणि ६ लोकल ट्रेन सेवांचाही विस्तार केला जाईल. यामुळे एकूण लोकल गाड्यांची संख्या १,४०६ आणि १५ डबे असलेल्या लोकलची संख्या २०९ वर जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पश्चिम रेल्वेवरील नव्या लोकल -

विरार ते चर्चगेट एक जलद लोकल, डहाणू रोड ते विरार पर्यंत दोन धिमी लोकल, अंधेरी, गोरेगाव आणि बोरिवली ते चर्चगेट प्रत्येकी एक धिमी लोकल, चर्चगेट ते नालासोपारा जलद लोकल, चर्चगेट ते गोरेगाव दोन धिमी, चर्चगेट ते गोरेगाव एक धिमी लोकल अंधेरी एक धिमी आणि दोन धिमी लोकल विरार ते डहाणू रोड पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या वेळापत्रकाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. पश्चिम रेल्वेवर जास्त लोकल धावणार असल्यामुळे प्रवाशांना गर्दीमुक्त प्रवास करता येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचे खास वैशिष्ट्ये -

- १२ नवीन लोकल ट्रेन सेवा

- १० लोकलसेवा १२ डब्यांऐवजी १५ डब्यांमध्ये धावणार

- ६ लोकल ट्रेनचा विस्तार

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचे खास वैशिष्ट्ये -

- २४ लोकल गाड्या परळपर्यंत वाढवल्या जाणार

- सीएमटीऐवजी दादरहून ११ जलद लोकल सुटणार

- ६ लोकल ट्रेन ठाणे ते कल्याणपर्यंत वाढवल्या जाणार

मध्य रेल्वेवरील शेवटच्या लोकल कधी सुटणार -

- सीएसएमटी ते कर्जत - रात्री १२:१२

- सीएसएमटी ते कसारा - रात्री १२:०८

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : PM मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पूर्व केली, अजित पवार

Rinku Singh Tattoo: रिंकू सिंगच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा; पण 'Gods Plan'चा नेमका अर्थ काय? VIDEO

बारामती नाही, मग अजित पवार कुठून लढणार? पाहा VIDEO

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Esha Negi: 'हे सगळं करावच लागेल...' टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काऊचा धक्कादायक किस्सा

SCROLL FOR NEXT