Mumbai Local Mega block  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega block : मुंबईत मेगाब्लॉक, रेल्वे प्रवाशांचे होणार मेगाहाल; कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

Mumbai Local Mega block Update : मुंबईत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल होण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

मध्य रेल्वेकडून रविवारी मोठा मेगाब्लॉक जाहीर

मध्य रेल्वेवर मेन मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील अनेक सेवा रद्द

जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड येथे धीम्या मार्गावर वळवल्या आहेत

मध्य रेल्वेने मुंबई लोकलसाठी रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकचा फटका रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील माटुंगा–मुलुंडदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ११.०५ ते १५.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.३६ ते १५.१० वाजेदरम्यान सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावरून डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

लोकलच्या या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या या मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे रेल्वे स्थानकातून ११.०३ ते १५.३८ वाजेदरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावरून अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. पुढे या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावरून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या गंतव्य स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक?

ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावर ११.१० ते १६.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरूळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ठाणे स्थानकातून १०.३५ ते १६.०७ वाजेदरम्यान सुटणाऱ्या वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन मार्गावरील सेवा आणि पनवेल/नेरूळ/वाशी येथून १०.२५ ते १६.०९ वाजेदरम्यान सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

रेल्वेकडून दिलगीरी व्यक्त

रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी देखभाल मेगाब्लॉक अत्यावश्यक आहेत. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून सहकार्याची विनंती रेल्वेने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT