Central Railway Kalyan Thakurli 
मुंबई/पुणे

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल तब्बल ४० मिनिटे उशिरा

Mumbai Local Service Disrupted : सकाळी सकाळीच मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला लेटमार्क लागलाय. कसारा-कल्याण यादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे लोकल विस्कळीत झाल्या आहेत. तब्बल ४० ते ५० मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत.

Namdeo Kumbhar

Mumbai Local Train: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-कसारादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झालाय. अप आणि डाऊन मार्गाच्या लोकल विस्कळीत झाल्याचे समोर आलेय.कामावर जाण्याच्या वेळी लोकल सेवेवर परिणाम झाल्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कसारा, कर्जत आणि कल्याण या रेल्वे मार्गावर एक्स्प्रेस गाड्या थांबलेल्या आहेत. लोकलबरोबरच एक्सप्रेस ट्रेनलाही लेटमार्क लागलाय.

मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. कल्याण-कसारा लोकल ट्रेन सेवा विस्कळित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसा, सध्या लोकल 40 ते 50 मिनिटाने उशिरा धावत आहे. लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल बंद आहेत. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवेवर परिणाम झालाय. कल्याण, कसारा आणि कर्जत स्थानकावर प्रवाशांची गर्दीच गर्दी दिसत आहे.

लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमाण्याचे हाल झाले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर ‌लोकल ट्रेन उभ्या करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कसारा, आसनगाव, टिटवाळा या महत्त्वाच्या स्थानकांवर लोकल ट्रेन एकामागे एक उभ्या आहेत. तांत्रिक बिघाड दुरूस्त झाल्यानंतरच सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

लोकलला विद्युत पुरवठा नसल्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल सेवा बंद झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कल्याण व कसारा दरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली आहे. कसाराहून कल्याणकडे व कल्याणहून कसाराकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल 40 ते 50 मिनिटे उशिराने धावत आहेत. कसारा व कल्याण दरम्यान विद्युत पुरवठा नसल्याने अप व डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा बंद झाल्या आहेत.यामुळे कामावर जाणाऱ्या चाकऱमाण्याचे हाल झाले आहे.

याआधीही सलग दोन दिवस हार्बर आणि मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी लोकल ठप्प झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. कल्याण-कसारा आणि कसारा कल्याण या मार्गावरील लोकल सध्या ४० ते ५० मिनिटे उशिराने धावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Robbery : सांगलीत बँकेवर धाडसी दरोडा, मध्यरात्री खिडकी तोडून आत शिरले; २२ लॉकरमधील ९ लाख लंपास

Women Haircut Styles : सणासुदीसाठी महिलांकरिता ट्रेंडी हेअरकट्स, पाहा फोटोज

Maharashtra Live News Update: भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

Rohit Pawar: 'अजित पवार KGF मधील रॉकी भाई'; रोहित पवारांकडून जाहिरसभेत काकांचं कौतुक |Video

Beed: राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा, कवाली कार्यक्रमातील VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT