Mumbai local train saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये चढताना तोल गेला, प्लॅटफॉर्म अन् ट्रेनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

Mumbai Local Accident: मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर एका तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला. लोकल अन् प्लॅटफॉर्मच्या मधोमध चिरडून या तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary:

  • मुंबईत लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

  • अंधेरी रेल्वे स्थानकावर घडली घटना

  • या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे

संजय गडदे, मुंबई

धावत्या लोकलमध्ये चढताना तोल जाऊन एक तरुण खाली पडला. यावेळी लोकलसोबत फरफटत जाऊन तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर घडली. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ४ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकावर घडली होती. हा तरुण प्लास्टिकच्या बॉटल गोळा करणारा होता. तो नेहमीप्रमाणे अंधेरी रेल्वे स्थानकावरून लोकल पकड होता त्यावेळी ही घटना घडली. पण काही लोकांचे म्हणणे आहे की, हा तरुण लघुशंकेसाठी रेल्वे रुळावर उतरला होता. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल आली. ही लोकल पाहून हा तरुण प्लॅटफॉर्मवर चढायला गेला. पण तेवढ्यात त्याला लोकलने धडक दिली. यावेळी लोकलसोबत फरफटत जाऊन तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध अडकला.

या अपघातामध्ये तरुणाच्या कमरेपासून खालचा संपूर्ण भाग तुटला गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तसंच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर आरपीएफ जवानांनी आणि रेल्वे प्रवाशांनी त्याला बाहेर काढले. लोहमार्ग पोलिसांनी त्याला तात्काळ उपचारासाठी विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात नेले.

मात्र रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातामध्ये कमरेखालचा भाग तुटल्याने आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मृत तरुणाजवळ कोणत्याही प्रकारचे ओळख पटवणारे कागद पत्र किंवा ओळखपत्र सापडून न आल्यामुळे त्याला बेवारस घोषित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy New Rule: ... तर बंद होणार गॅस सबसिडी, 7 दिवसांत करा हे काम, फोनवर आलेल्या मेसेजमध्ये नेमकं काय?

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा होणार सुनावणी

Fort In Kolhapur : रणनीती, लढाई अन् समर्पण, कोल्हापूरला गेल्यावर न विसरता पाहा 'हा' ऐतिहासिक किल्ला

CM विजय यांना विश्वासदर्शक ठरावापूर्वी कोर्टाचा दणका; TVK आमदाराला विधानसभेत प्रवेश नाकारला

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा, फक्त व्याजातून मिळणार 4.50 लाख

SCROLL FOR NEXT