Mumbai Local Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, गर्दीमुळे हात सटकला अन् थेट खाडीत पडला

Mumbra Railway Station: मुंबईमध्ये सोमवारी १७ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना मंगळवारी २७ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाला.

Priya More
  • मुंबई लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू

  • धावत्या लोकलमधून तरुण खाली पडला

  • लोकलमधून मुंब्रा खाडीमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाला

  • मुंबई लोकलमधून पडून सलग दुसऱ्या दिवशी तरुणाचा मृत्यू

मुंबईमध्ये धावत्या लोकलमधून पडून सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकलमधून हा तरुण प्रवास करत होता. गर्दी असल्यामुळे तो दारातच उभा होता. त्याचवेळी हात सटकून हा तरुण थेट मुंब्रा येथील खाडीत पडला. यावेळी लोखंडी रॉड लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साईराज बेणारे (२७ वर्षे) असं या तरुणाचे नाव होते. साईराज नेहमीप्रमाणे लोकलने प्रवास करत होता. मंगळवारी सकाळी त्याने मुंबईच्या दिशेने येणारी लोकल पकडली. लोकलला प्रचंड गर्दी होती त्यामुळे त्याला आत जाता आले नाही. प्रचंड गर्दीमुळे त्याचा हात सटकला आणि तो थेट मुंब्रा ब्रिजवरून खाडीत पडला. यावेळी साईराज ब्रिजच्या लोखंडी रॉडला अडकला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या साईराजचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलिस आणि मुंब्रा पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच वेळाच्या प्रयत्नांनंतर त्यांनी साईराजचा मृतदेह वर काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. साईराजच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सोमवारी देखील धावत्या लोकलमधून पडून एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. हा मुलगा मित्रांसोबत मुंबईत फिरण्यासाठी आला होता. पण धावत्या लोकलमधून प्रवास करताना या मुलाचा हात सटकला आणि तो खाली पडला. ही घटना कळवा रेल्वे स्थानकाजवळ घडली होती. मोहम्मद फाजील अन्सारी असं या मुलाचे नाव होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

Urine Infection : लहान मुलांना युरिन इन्फेक्शन झाले तर शरीर देते 'हे' संकेत; पावसाळ्यात वेळीच उपचार करा, नाहीतर...

गोळ्या, औषधांची गरज नाही! फक्त हे एक ड्रिंक प्या, पोटदुखी कायमची थांबेल

8th Pay Commission : सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹69 हजार मिनिमम सॅलरी, ₹45 हजार पेन्शनची मागणी

Rahul Gandhi: 'राहुल गांधी चर्चेपासून पळू नका...', सत्ताधारी आक्रमक, संसद परिसरात काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT