Mumbai Local Train Accident update  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Accident : लोकलमधील मृत्यूचा थरार; दिवा- मुंब्र्यात काय घडलं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Mumbai Local Train Accident update : मुंबईची लाईफलाईन डेथलाईन झालीय... याच लोकलच्या ढिसाळ कारभारामुळे लोकल ट्रॅकवर मृत्यूचा थरकाप उडवणारी घटना घडलीय... नेमकं दिवा आणि मुंब्र्यादरम्यान रेल्वे ट्रॅकवर काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

एका आईची हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश....हा आक्रोश झापड लावलेल्या निर्ढावलेल्या रेल्वे प्रशासनाच्या कानापर्यंत कधी पोहचणार.... देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अपुऱ्या लोकल, प्रवाशांची गर्दी आणि लोकलच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवा- मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना घडली आणि त्यात गर्दीमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या चार जणां

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गर्दीच्या रेट्याने कसारा सीएसएमटी लोकलमधून पडून चारजण हकनाक बळी गेले. मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली? त्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीय.

रेल्वे प्रशासनाने लोकलमधून 8 जण पडल्याची माहिती दिली असली तरी पोलिसांनी मात्र लोकलमधून 13 जण पडले त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीय.. मृत्यूचा हा थरार उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलाय.

लोकलच्या फूटबोर्डवरुन उभं राहून लटकत, लोंबकळत जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची कुणालाही हौस नसते... मात्र नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना लोकलशिवाय पर्याय उरत नाही. ढिसाळ नियोजनाअभावी वर्षभरात अडीच हजार प्रवाशांचा मृत्यू झालाय.. त्यामुळे गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग कधी येणार? आणि प्रवाशांच्या मृत्यूची मालिका कधी थांबणार? हाच सवाल विचारला जातोय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT