Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj and Uddhav ThackeraySaam Tv News

Maharashtra Politics : हीच ती वेळ, महाराष्ट्र हितासाठी..! ठाकरे बंधू एकत्र येणार? कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा

Maharashtra Political Update : ठाकरे बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या संबंधित काही बॅनर मुलुंडमध्ये लागले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Published on

मयूर राणे, साम टीव्ही

गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, असं बोललं जात होतं. आता हे प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास मनसैनिक आणि शिवसैनिकामध्ये दिसून येत आहे. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह येथे आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमा दरम्यान मुलुंड मध्ये 'ठाकरेबंधू मनोमिलन'चे लावण्यात आलेल्या बॅनरमुळे मुलुंडकरांमध्ये चर्चा रंगली आहे.

कालिदास नाट्यगृहात होणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाबाहेर लावलेले 'ठाकरे मनोमिलन'चे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. "वाट बघतोय महाराष्ट्र, साद घालतोय महाराष्ट्र..! हीच ती वेळ, महाराष्ट्र हितासाठी..!" असे आशय असलेले मुलुंडमध्ये लावण्यात आलेले बॅनर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Mumbai Local Train Accident: हात निसटला, तो कायमचाच! शहाडमधील तरुणाचा लोकल अपघातात मृत्यू, आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो

बॅनरवर धडकी ठाकरेंची, महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक, मुलुंड विधानसभा असा उल्लेख आहे. शिवसेनेच्या विभागलेल्या गटांमध्ये समेटाची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकीय वर्तुळात याला ‘युतीची नांदी’ मानले जात आहे. राजकीय नेत्यांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, हा प्रकार शिवसेनेतील संभाव्य एकत्रीकरणाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Pune Shocking : पुण्यात आणखी एक 'वैष्णवी'; हुंड्यासाठी जीवघेणा छळ, २३ वर्षीय विविहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं आयुष्य

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील या चर्चांनी जोर धरला आहे. कारण, दुसरं तिसरं कोणी नाही, तर थेट राज आणि उद्धव या दोन्ही भावांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येतील का? यावर चर्चा करण्यापेक्षा दोघंही एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं? आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणं कसं बदलू शकतात? राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याची चर्चा सुरू आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Marathi Gujarati clash : आपुल्याच घरात हाल सोसतो मराठी माणूस; घाटकोपरमध्ये गुजराती कुटुंबाकडून गायकवाड कुटुंबाला मारहाण, VIDEO आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com