lalbaug raja visarjan 2026 marathi news  Saam tv
मुंबई/पुणे

Lalbaug Raja Visarjan : "पुढच्या वर्षी लवकर या" २४ तासानंतर लालबागच्या राजाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Lalbaugcha Raja Visarjan News : अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभर गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. आज ढोल-ताशांच्या गजरात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

Alisha Khedekar

  • अनंत चतुर्दशीला मुंबईसह राज्यभर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला

  • लालबागच्या राजाचे आज मोठ्या भक्तिभावात विसर्जन झाले

  • विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशे, लेझीम आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मुंबई दुमदुमली

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यभर लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांपासून भक्तांच्या लाडक्या गणरायाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने गजबजलेले मुंबई शहर काल त्याच्या विसर्जन मिरवणुकांनी दुमदुमून गेले. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. काल सकाळपासूनच विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ झाल्या होत्या. बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भक्तांच्या डोळ्यांत बाप्पाला निरोप देताना अश्रू तरळले, तर ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला.

मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे आज भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. काल १२ वाजता राजाची मंडपातून मिरवणूक काढण्यात आली. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त सहभागी झाले होते. बाप्पाच्या दर्शनासाठी आणि विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

गेल्या दहा दिवसांत गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईसह देशभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या काळात विविध मंडळांकडून धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता होत असताना भक्तांनी बाप्पाकडे सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्रार्थना केली. गणरायाच्या विसर्जनानंतर आता पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा सुरू झाली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Google Maps : इंटरनेट किंवा नेटवर्क नसताना गुगल मॅप्स कसे वापरावे? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Radish benefits: 90 दिवस रोज खा 1 मुळा; शरीराला मिळणारे फरक पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Breaking News: मोठी बातमी! राज्यात अखेर दुष्काळ जाहीर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Gold Rate Today: सोन्याचे दरात मोठी घसरण, १६०० रुपयांनी सोनं स्वस्त ; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय! राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर

SCROLL FOR NEXT