MUMBAI DRUG RACKET saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत ड्रग्ज विक्री, आरोपी तामिळनाडूत फरार; पोलिसांनी असा लावला छडा

Kandivali MD Drug Racket Two Accused Arrested In Tamil Nadu: मुंबईतील कांदिवली पूर्वेच्या बिहारी टेकडी परिसरातील एमडी ड्रग्ज विक्रीप्रकरणी समतानगर पोलिसांनी तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथून दोन फरार आरोपींना अटक केली.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई: कांदिवली पूर्वेतील पोईसर, बिहारी टेकडी परिसरात सुरू असलेल्या एमडी (मेफेड्रोन) या अमलीपदार्थाच्या विक्रीप्रकरणी समतानगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या माला हरिश्चंद्र राय (२७) आणि अविनाश मोहननाथ झा उर्फ लोटा (३५) या दोघांना पोलिसांनी तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथून अटक केली आहे. या कारवाईत सुरुवातीला २३९ ग्रॅम एमडी, पाच लाख रुपये रोख आणि वजनकाटा जप्त करण्यात आला होता. तर आरोपींच्या तामिळनाडूतील घरझडतीत आणखी अडीच लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.

समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमाशंकर चाळ, बिहारी टेकडी, पोईसर, कांदिवली पूर्व येथे माला हरिश्चंद्र राय आणि अविनाश झा उर्फ लोटा हे एमडी अमलीपदार्थाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना २८ सप्टेंबर २०२६ रोजी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच माला राय आणि अविनाश झा यांनी घराच्या मागील खिडकीतून छतावर उतरून पळ काढला. यावेळी पोलिसांना पाहून माला राय हिने खांद्यावरील बॅग छतावर लपवून ठेवली. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये २३९ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आढळून आले. या अमलीपदार्थाची अंदाजे किंमत ७ लाख १७ हजार रुपये असून, बॅगेत पाच लाख रुपये रोख आणि एक वजनकाटाही मिळून आला.

या प्रकरणी माला हरिश्चंद्र राय, अविनाश मोहननाथ झा उर्फ लोटा आणि पूजा राय या तिघांविरोधात समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३२/२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत २९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते. फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून माला राय आणि अविनाश झा हे तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर समतानगर पोलिसांचे पथक तामिळनाडूला रवाना झाले. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन या गुन्ह्यात अटक केली. यावेळी आरोपींच्या घराची झडती घेतली असता दोन लाख ५० हजार रुपये रोख रक्कमही पंचनाम्याअंतर्गत जप्त करण्यात आली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आणि सहायक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय कावडे, सहायक पोलीस निरीक्षक राऊत, पोलीस उपनिरीक्षक भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक तोंडवळकर तसेच पोलीस हवालदार शिंदे, पोलीस शिपाई नाईक, वेदांते, महिला पोलीस शिपाई बलमे आणि देवकाते यांनी ही कामगिरी केली. या प्रकरणातील पूजा राय या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, अमलीपदार्थ विक्रीच्या या रॅकेटसंदर्भात पुढील तपास समतानगर पोलीस करत आहेत.

Sequin Saree For Women : महिलांसाठी सिक्वेन साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन , यंदा दिवाळीत नक्की ट्राय करा

Maharashtra News Live Update: मुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर

Pune School: पुण्यातील १० शाळांची मान्यता रद्द, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; विद्यार्थी अन् पालक चिंतेत

Health Tips : झोपेत अचानक झटका का बसतो? काय आहे मागचे नेमके कारण

Brass Samai For Lakshmi Puja: पितळेच्या समईचे 5 सुंदर प्रकार, लक्ष्मीपूजनाच्या पूजेसाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT