Mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : रात्री चोरी, दिवसा फळ विक्री; मुंबईत फळ विक्रेत्याचा काळा धंदा उघड

Mumbai Crime News : मुंबईतील कांदिवली पूर्व भागात फळ विक्रेत्याच्या नावाखाली सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणाचा समता नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी रात्री फळे चोरून मीरा रोड येथे विक्री करत होता.

Alisha Khedekar

  • कांदिवली पूर्व येथे फळ चोरीचा प्रकार उघड

  • आरोपी रात्री चोरी करून मीरा रोडला विक्री करत होता

  • सीसीटीव्ही आणि रिक्षाच्या धाग्याने आरोपी पकडला

  • एक आरोपी अटक, दुसरा फरार; तपास सुरू

संजय गडदे, मुंबई

Mumbai Kandivali Fruit Seller Theft Mira Road News मुंबईत फळ विक्रेत्याच्या नावाखाली सुरू असलेल्या चोरीच्या धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. कांदिवली पूर्व येथील रस्त्यावरील फळांच्या स्टॉल्सवर रात्रीच्या अंधारात चोरी करून तेच फळे दुसऱ्या दिवशी मीरा रोड येथे स्वतःच्या दुकानात विकणाऱ्या आरोपीला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. रवी चौरसिया (रा. मीरा रोड) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चौरसिया रात्री उशिरा बंद असलेल्या स्टॉल्सचे कुलूप तोडून महागडी आणि ताजी फळे चोरी करत असे. ही फळे तो ऑटो-रिक्षाच्या माध्यमातून मीरा रोडला नेत असे आणि दुसऱ्या दिवशी स्वतःच्या स्टॉलवर विक्री करत असे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

कांदिवली पूर्व येथील रामनगर भागातील एका विक्रेत्याने 31 मार्च रोजी चोरीची तक्रार दिली होती. या प्रकरणात सुमारे 12 हजार रुपयांच्या फळांची चोरी झाली होती. याआधीही त्याच परिसरात सुमारे 72 हजार रुपयांची फळे चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अनेक विक्रेत्यांच्या तक्रारी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगेश कुमार पीएसआय कोल्हापूर ए एस आय तोंडवलकर, एच सी ननावरे पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे साबळे आणि भिकले या तपास पथकाने अथक परिश्रम करून आरोपीचा शोध घेतला.

ऑटो-रिक्षाच्या धाग्याद्वारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याचा एक साथीदार फरार आहे. या प्रकरणात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तोंडलीची रस्सा भाजी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

December Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! RBI ने जाहीर केली यादी

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

Shirdi Vande Bharat : रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 'या' स्थानकावरही थांबणार, कोणाला होणार फायदा?

बंडखोर आमदारांच्या गटाला हायकोर्टाचा धक्का! प्रमुख नेत्याची निवड अवैध, विधानसभाध्यक्षांचा निर्णयही बदलला

SCROLL FOR NEXT