Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मित्रांनीच केला घात! मुंबईत १७ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ तयार केला अन्...

Kandivali Mumbai Crime: मुंबईतल्या कांदिवलीमध्ये १७ वर्षांच्या मुलीवर मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. पोलिस सध्या तपास करत आहेत.

Priya More

मुंबईमध्ये १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतल्या कांदिवली परिसरात ही घटना घडली. मित्रांनीच आपल्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट करत मुलीला धमकावले. याप्रकरणी तिघांविरोधात समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या कांदिवलीमध्ये १७ वर्षांच्या मुलीवर मित्रांनीच सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. बलात्कार करून त्याचा व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ६ जानेवारीला ही घटना घडली असून ती आता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीला आरोपींनी बोलावरून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर त्याचा व्हिडीओ देखील शूट केला. आरोपी १८, २० आणि २१ वयोगटातील आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली. या तिघांविरोधात समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समता नगर पोलिसांनी तिघांविरोधात बलात्कार, सामूहिक बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. तिन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ७०(२), ७४ याशिवाय पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १० आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६(ई) अंतर्गत गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून त्यांचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT