atal setu j j hospital doctor suicide Saam Tv News
मुंबई/पुणे

'लवकरच घरी आलो जेवायला'; आईला शेवटचा फोन, J.J हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन समुद्रात उडी

Mumbai J.J Hospital Doctor Commits Suicide : मुंबईतील प्रसिद्ध जे.जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे ३२ वर्षीय डॉक्टर ओंकार कवितके यांनी सोमवारी रात्री अटल सेतूवरून उडी मारली. घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांनी त्यांच्या आईशी बोलून लवकरच घरी जेवणासाठी परत येत असल्याचं सांगितलं होतं.

Prashant Patil

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध जे.जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे ३२ वर्षीय डॉक्टर ओंकार कवितके यांनी सोमवारी रात्री अटल सेतूवरून उडी मारली. घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच त्यांनी त्यांच्या आईशी बोलून लवकरच घरी जेवणासाठी परत येत असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली आणि डॉक्टरचा शोध अजूनही सुरू असल्याचं सांगितलं. डॉ. ओंकार कवितके हे नवी मुंबईतील कळंबोली भागातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री एका मोटारचालकाने त्यांना पुलावर त्यांना पाहिलं आणि त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

पुलावर कार आणि आयफोन सापडला

नवी मुंबईतील उलवे पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पुलावर पार्क केलेली होंडा अमेझ कार आढळली. कारमध्ये एक आयफोन ठेवण्यात आला होता. फोनमध्ये सापडलेल्या नंबरच्या मदतीने पोलिसांनी कार मालकाची ओळख डॉ. ओंकार म्हणून केली, जे गेल्या सहा वर्षांपासून मुंबईतील जे.जे हॉस्पिटलमध्ये काम करत होते.

उलवे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अर्जुन राजणे यांनी सांगितलं की, फोन कॉल डिटेल्सवरून असं दिसून आलं की डॉक्टरने रात्री ९ वाजून ११ वाजता त्यांच्या आईला फोन केला होता, आणि ते लवकरच जेवणासाठी घरी येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतरही त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाहीय. त्यांनी असं पाऊल का उचललं हे समजून घेण्यासाठी पोलीस आता कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी बोलत आहेत. सध्या पोलिसांनी ही घटना संशयास्पद आत्महत्या मानून तपास सुरू केला आहे. समुद्रात शोध मोहीम सुरू आहे.

डॉ. ओंकार यांचा शोध घेण्यासाठी मरीन पोलीस आणि कोस्ट गार्डच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे. मात्र, अद्याप त्यांचां कोणताही पत्ता लागलेला नाही. डॉ. कवितके यांनी इतकं मोठं पाऊल का उचललं? हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. पोलीस सध्या या प्रकरणाचा प्रत्येक पैलूवरून तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT