Mumbai : 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन नियमावली जाहीर, मंदिरासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय! 
मुंबई/पुणे

Mumbai : 'ब्रेक द चेन' अंतर्गत नवीन नियमावली जाहीर, मंदिरासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : देशासह राज्यावरील कोरोना महामारीचे सावट अद्यापही बाकी असल्याने, साथरोग नियमांची अंमलबजावणी राज्यात सुरुच आहे. कोरोना काळात मंदिर उघडण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आंदोलने विरोधी पक्षांकडून करण्यात आल्यानंतर, अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उडण्याचा निर्णय जाहीर केला.

हे देखील पहा :

परंतु, राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पूर्णपणाने संपला नसून, अजूनही कमी प्रमाणात का होईना पण, कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळांकरता सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व प्रार्थस्थळांमध्ये, तेथील क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणात भाविकांना उपस्थित राहता येणार आहे. सोशल डिस्टंसींगचे पालन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर तसेच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्या विरुद्ध साथरोग नियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

SCROLL FOR NEXT