Mumbai House Collapse: Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai House Collapse: क्षणात भयंकर घडलं! मानखुर्दमध्ये ३ मजली घर कोसळलं, ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Mankhurd Building Collapse: मानखुर्दमध्ये ३ मजली घर कोसळलं. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली.

Priya More
  • मानखुर्दमध्ये तीन मजली घर कोसळले

  • मुंबई पावसामुळे घर कोसळल्याची घटना

  • मानखुर्दमध्ये घर कोसळून ६ जणांचा मृत्यू

  • मुसळधार पावसामुळे घडली मोठी दुर्घटना

मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मानखुर्दमध्ये तीन मजल्याचे घर कोसळलं. या घराचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली.या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुंबईमध्ये गेल्या ३ ते ४ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने आतापर्यंत १० जणांचा बळी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे साडेआठ वाजता सुमारास ही घटना घडली. मानखुर्द येथील हनुमान मंदिरामागील जनता नगर भागातील तीन घर कोसळलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता होती. याठिकाणी बचावकार्य करत एनडीआरएफच्या पथकाने ६ जणांना बाहेर काढलं. पण या सर्वांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, मानखुर्द परिसरात ३ मजली बांधकाम सुरू असलेले घर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पुरूष आणि ४ महिलांचा समावेशआहे. पाच जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तर एकाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मुंबईत सतत पडणाऱ्या पावसामुळे घरं कोसळण्याच्या आणि झाड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी कुर्ला आणि गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये अंगावर झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. त्याआधी चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. तर साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हे चौघे आणि मानखुर्दच्या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E20 Fuel Protest : मोठी बातमी! GEN G नंतर आता आणखी एक आंदोलन; E 20 वरून सरकारला घेरणार, या ६ मागण्या केल्या

कल्याणमधील गांधारी पुलाची दयनीय अवस्था! दररोज वाहतूक कोंडी; पावसात खड्ड्यांचा अंदाज येईना

Maharashtra News Live Update: अकोल्यात पीडित मुलीच्या मृतदेहासह रस्ता रोको; आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेची मागणी

Actress Breast Cancer: ज्येष्ठ अभिनेत्रीने स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे लपवले, कारण सांगत म्हणाल्या, 'काम मिळण्यासाठी...'

Skin Problems Alert : चेहऱ्यावर आणि त्वचेवर दिसणारी 'ही' चिन्हं असू शकतात धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT