crime news  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : कपडे काढण्यास सांगितले अन्...; बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार, कंपनीच्या MDसह 5 जणांवर गुन्हा

Mumbai Crime news : मुंबईत बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कंपनीच्या MDसह 5 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Vishal Gangurde

मुंबईत ५१ वर्षीय महिलेवर अत्याचार आणि छळ

महिलेवर बंदुकीच्या धाकावर अत्याचार

फार्मा कंपनीच्या MDसह पाच जणांवर गुन्हा

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईत ५१ वर्षीय व्यावसायिक महिलेला बंदुकीच्या धाकावर विवस्त्र करून तिचे व्हिडिओ आणि फोटो काढण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीत खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

महिलेचा छळ केल्याप्रकरणी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कंपनीत बोलावून तिच्यावर छेडछाड केल्याची तक्रार आहे. बंदुकीच्या धाकावर महिलेला कपडे उतरवायला लावून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर या महिलेचे व्हिडिओ बनवले गेले.

तक्रारदाराच्या म्हणण्यांनुसार, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. घटनेनंतर महिलेनं पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीच्या आधारे मॅनेजिंग डायरेक्टरसह पोस्टसह पाच जणांविरोधात 354A, 354B, 326, 509, 506 आणि IT Act 66A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आ

7 वर्षांच्या मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार

नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी ७ वर्षीय चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. नांदेडमधील इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली. चिमुकली शाळेत जाण्यासाठी नकार देत असल्याने आईने विचारपूस केली. त्यानंतर चिमुकलीने शिक्षकाने केलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंबईत नेमकी कोणती घटना घडली?

व्यावसायिक महिलेला कंपनीच्या ऑफिसमध्ये बंदुकीच्या धाकावर विवस्त्र करून व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर

पीडित महिलेने आरोप कोणावर केले आहेत?

महिलेने कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि इतर चार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

अजितदादांच्या जाहीरनाम्यात मेट्रो प्रवास मोफत, फडणवीसांनी उडवली दादांची खिल्ली

रवींद्र चव्हाण पडले मौलवींचे पाया? मौलवी भाजपच्या सभेत?

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचे 'कॅन्डिडेट बॉम्ब'; १५ कोटींची ऑफर नाकारणारे उमेदवार स्टेजवरच आणले

SCROLL FOR NEXT