Hit and run Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai hit and run case: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; नशेत धुंद असलेल्या कारचालकाने दोघांना चिरडलं, मुलाचा जागीच मृत्यू

Drunk driving accident Mumbai: वडाळ्यात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने चारचाकी महिला आणि चिमुकल्याच्या अंगावरून नेली. यात मुलाचा जागीच मृत्यू झालाय.

Bhagyashree Kamble

मुंबईत अपघातांचे सत्र सुरूच आहे. मुंबईतील वडाळ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. घरासमोर महिला आणि त्यांचा लहान मुलगा झोपला होता. मात्र, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनानं दोघांना चिरडलं.

चालक दारूच्या नशेत होता. या घटनेत तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, जखमी महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तपास करून फरार आरोपीला ताब्यात घेतलंय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिला प्रिया लोंढे या रात्रीचे जेवण तयार करून आपल्या घराबाहेर मोकळ्या जागेत बसल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. दोघेही बाहेर झोपले होते. काही वेळानंतर भरधाव वेगानं कार आली. कारनं रस्त्यावर झोपलेल्या महिला आणि मुलाला चिरडलं.

चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. नंतर कार चालक फरार झाला. कारनं चिरडल्यानंतर चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर, महिला गंभीर जखमी झाली आहे. स्थानिक नागरीकांनी धाव घेत महिला आणि मुलाला रूग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं.

तर, महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेने कारचालकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

किडवाई मार्ग पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT