संजय गडदे, साम प्रतिनिधी
Mumbai Hit And Run Case : मुंबईमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्वेकडील ऑबेरॉय मॉलसमोर भरधाव वेगाने डंपरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. दुचाकीला धडक दिल्यानंतर डंपर चालकाने पळ काढला.
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉल समोरील रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर डंपर चालक हा फरार झाला. पण काही वेळात दिंडोशी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. डंपरने दिलेल्या धडकेत झालेला अपघात इतका भीषण होता की तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा जागेवरच मृत्यू झाला तर वडील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमी चालकाला जवळील हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
ओबेरॉय मॉल हा अपघात झाला. त्यानंत परिसरात एकच धावपळ उडाली. लोकांचा रोष पाहून डंपर चालकाने पळ काढला होता. उपस्थितांपैकी काहींनी दिंडोशी पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती दिली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून डंपर चालकाला ताब्यात घेतले.
अधिक माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेकडे असणाऱ्या सेंट झेवियर्स शाळेमध्ये जाण्यासाठी तेरा वर्षीय मुलगी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जाण्यासाठी निघाली होती. मात्र साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडील ओबेराय मॉल समोर असणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगात येणाऱ्या डंपर ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या मुलीला गंभीर मार लागला. डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला यातच तिचा जागेवर मृत्यू झाला. घटनेनंतर डंपर चालक हा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मयत मुलगी आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून जवळच्या जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ए डी आर दाखल करून डंपर चा मालक आणि डंपर ताब्यात घेतला असून आरोपी डंपर चालकाचा शोध घेण्याचे काम दिंडोशी पोलिसांनी सुरू केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.