बेकायदा बांधकामांच्या कारवाईला असलेली स्थगिती ३० ऑगस्टपर्यंतच 
मुंबई/पुणे

बेकायदा बांधकामांच्या कारवाईला असलेली स्थगिती ३० ऑगस्टपर्यंतच

कोरोनाविषयक परिस्थिती सुधारल्याने व कोर्टांचे कामकाजही सुरूळीत सुरु झाल्याने अंतरिम संरक्षण ३० ऑगस्टपर्यंतच राहणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरोना (Covid19) संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे बेकायदा बांधकामे (Illegal constructions), झोपड्या तोडणे, मालमत्ता रिक्त करून घेणे, यासारख्या प्रशासनाच्या कारवाईला असलेली अंतरिम स्थगिती (Interim adjournment) ३० ऑगस्टपर्यंतच राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पुर्णपीठाने हा आदेश जारी केला आहे. (The moratorium on illegal construction will remain in place till August 30)

पुर्णपीठाने ५ जुलैपासून प्रशासनाच्या या कारवाईला अंतरिम संरक्षण दिले होते. मात्र आता कोरोनाविषयक परिस्थिती सुधारल्याने व कोर्टांचे कामकाजही सुरूळीत सुरु झाल्याने अंतरिम संरक्षण ३० ऑगस्टपर्यंतच राहणार असल्याचे, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्या. अमजद सय्यद, न्या. संभाजी शिंदे, न्या. प्रसन्ना वराळे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

हे देखील पहा-

त्याचबरोबर, पुण्याच्या मेट्रो प्रकल्पातील सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशनच्या उभारणीत अडथळा ठरत असलेल्या झोपड्यांवर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा मार्ग १ सप्टेंबरपासून मोकळा करण्यात आल्याने न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर, ‘पुण्यातील संबंधित झोपड्यांच्या भागात खप असलेल्या एक मराठी व एक हिंदी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करावी आणि त्या परिसरातही दर्शनी भागात नोटीस चिकटवावी. जेणेकरून कोणाला कायद्यानुसार दाद मागायची असल्यास ते मागू शकतील’, असेही पूर्णपीठाने महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशनला निर्देश दिले आहेत.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गाडीवर पोलिसांचा फास; उसाच्या शेतातून कार जप्त|VIDEO

Maharashtra Live News Update : बंजारा समाज आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं हाता-पायांवर सर्वात आधी दिसतात? तज्ज्ञांनी सांगितली संपूर्ण माहिती

Virar Tourism : विरारमध्ये लपलंय एक सुंदर लोकेशन, जे पाहताच तुम्ही कुल्लू मनाली विसराल

Baklava Recipe: बिग बॉस फेम तान्या मित्तलला आवडणार बकलावा कसा करायचा घरी, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT