Maratha Reservation  Saam tv
मुंबई/पुणे

Maratha Reservation : 'मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू असताना 'बिग बॉस'मध्ये जाऊन बसलेत', कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांना झापलं

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षाविरोधात दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ अंतिम युक्तिवाद करणार आहेत. या सुनावणीदरम्यान, कोर्टाने अॅड. गुणरत्न सदावर्तेंना झापलं. कोर्टाने सदावर्तेंच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाविरोधातील (Maratha Reservation) याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, मुंबई हायकोर्टाने गैरहजर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना झापल्याची माहिती हाती आली आहे.

'मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना गुणरत्न सदावर्ते बिग बॉसमध्ये जाऊन बसले आहेत, अशी माहिती इतर वकिलांकडून हायकोर्टाला मिळाली. मराठा आरक्षणावरील प्रकरणातील मूळ याचिकाकर्त्यांना याचं गांभीर्य नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या, अशी विनंती गुणरत्न सदावर्ते करत होते. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले? असा सवाल हायकोर्टाने केला.

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला. आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असेही हायकोर्टाने नमूद केले. मराठा आरक्षणावरील या सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील प्रकरणाची हायकोर्टातील पूर्णपीठापुढील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणीत कोर्टात काय युक्तिवाद होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

मंत्रिमंडळात मराठा आरक्षणावर निर्णय नाही

राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतही मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या आचारसंहितेआधी राज्य मंत्रिमंडळात मराठा आरक्षणावर निर्णय घ्या, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना सरकारला दिला होता. येत्या दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Insurance: क्या बात, क्या बात! डेबिट कार्डवर फ्रीमध्ये मिळतो जीवन विमा, कधी करता येतो क्लेम, जाणून घ्या

Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; नाना पटोले यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Updates: बदलापुरात महानगर गॅसची मुख्य पाईपलाईन फुटली

New Justice Statue In SC: आता न्यायदेवता डोळस होणार! न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील काळी पट्टी काढली, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची पहिली लढत ठरली; दोन्ही राष्ट्रवादींमध्ये होणार थेट सामना?

SCROLL FOR NEXT