Mumbai Weather yandex
मुंबई/पुणे

Mumbai Weather: मुंबईची हवा विषारीच, राज्यातील २२ शहरे प्रदूषित, धुरक्याचे साम्राज्य

Mumbai Fog: मुंबईची हवा विषारीच ठरली. बोरिवली, मालाड, नेव्ही नगर, माझगाव, आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे.

Dhanshri Shintre

मुंबई आणि परिसरात प्रदूषणाचा स्तर चिंताजनक पातळीवर पोहोचला असून, सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शहर आणि उपनगरांमध्ये दाट धुरकं पसरलेलं दिसून आलं. धुरक्याचा परिणाम इतका गंभीर होता की, फक्त २००-३०० मीटर अंतरावर असलेल्या वाहने आणि इमारतीसुद्धा अस्पष्ट झाल्या. बोरिवली, मालाड, नेव्ही नगर, माझगाव, आणि देवनार या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे.

शहरवासीयांना श्वासोच्छवासाच्या त्रासासह दृष्टीआड होणाऱ्या दृश्यांचा सामना करावा लागत आहे. हवेतील घटकांमुळे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असा तज्ज्ञांचा इशारा आहे. प्रशासनाने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

शुक्रवारी पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दुपारच्या सुमारास दाट धुरक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली होती. गेल्या महिन्यात सुमारे १० ते १५ दिवस 'वाईट' दर्जाची हवा नोंदवली गेली, तर काही दिवस 'अतिवाईट' दर्जाची हवा कायम राहिली. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक कडक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नोव्हेंबरपासून मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० या श्रेणीत नोंदवला जात आहे, जो आरोग्यासाठी हानीकारक मानला जातो. वार्‍याचा अभाव असल्याने प्रदूषक घटक वातावरणात साचून राहतात, याचा परिणाम शहरातील अनेक भागांमध्ये दिसून येत आहे. या प्रदूषणामुळे हवा अधिक दाट होत असून, त्याचा आरोग्यावर आणि जीवनमानावर नकारात्मक परिणाम होत आहे. नागरिकांना या परिस्थितीत सतर्क राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्रशासनाने या समस्येवर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

हवामानाचा दर्जा कुठे, किती आणि कसा? जाणून घ्या

मालाड - २६६ वाईट

बोरिवली - २०९ वाईट

नेव्हीनगर - २७० वाईट

माझगाव - २०९ वाईट

देवनार - २०१ वाईट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT