Saam Headlines Mumbai Pune saam tv
मुंबई/पुणे

Mumbai- Pune News : भाजप नेत्याच्या भावाला अटक, दत्ता गाडेच्या वकिलावर हल्ला; मुंबई, पुण्यातील बातम्या एका क्लिकवर

Mumbai-Pune News Updates : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. दुसरीकडे पुण्यातील स्वारगेट बस डेपो घटनेतील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर हल्ला करण्यात आला आहे. वाचा मुंबई आणि पुण्यातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nandkumar Joshi

पोलीस-पत्रकारांमध्ये बाचाबाची

विधानभवनात पोलीस आणि पत्रकारांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी धक्काबुक्की केल्यामुळे पत्रकार आक्रमक झाले. पत्रकारांनी विधानभवनातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांची भेट घेतली. त्यांची समजूत काढली. त्यानंतर पत्रकारांनी आंदोलन मागे घेतलं.

कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. तसेच सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

भाजप नेत्याच्या भावाला अटक

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या 122 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या घोटाळा प्रकरणात भाजप नेत्याच्या भावाला अटक करण्यात आली. जावेद आझमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जावेद आझम भाजपचे माजी महाराष्ट्र सचिव हैदर आझम यांचा भाऊ आहे. या घोटाळा प्रकरणातील ही सातवी अटक आहे.

छोटा राजनला दिलासा

गँगस्टर छोटा राजन याला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याची एका गुन्ह्यात निर्दोष सुटका केली. हे प्रकरण दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आहे. छोटा राजन सध्या तिहार तुरूंगात बंद आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते.

'EWS' प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर MPSC कडून अन्याय

मराठा समाजासाठी SEBC आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा EWS प्रवर्गामध्ये समावेश केलाय. कायद्यानुसार एका समाजाच्या विद्यार्थ्याला एकाच प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्यामुळे 'ईडब्ल्यूएस' प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर आयोग अन्याय करत असल्याची भावना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

दत्ता गाडेच्या वकिलावर हल्ला

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. साहील डोंगरे असे वकिलाचे नाव आहे. १७ मार्चला सायंकाळी डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले. अपहरण करून त्यांना बोपदेव घाटात नेण्यात आले. दिवे घाटात त्यांना मारहाण करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना विनंती, फुरसुंगी भेकराई नगरमध्ये पोस्टर

पुण्यातील देवा भेकराई नगरमध्ये महापालिका काम करत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी नगरपरिषदेचा फेरविचार करावा अशा आशयाचे पोस्टर फुरसुंगी भेकराई नगरमध्ये लावण्यात आले. याठिकाणी विविध समस्यांचा डोंगर वाढलाय. मात्र त्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेची यंत्रणा नसल्याची माहिती समोर आलीय.

पुण्यात तापमानात घट

पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात घट झाली आहे. पुण्यात काल ३८.२ इतक्या तापमानाची नोंद झालीय. वातावरण काहीसे निवळल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

शिरूरमध्ये पोलिसांची कारवाई

शिरूरमध्ये 35 सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले असून, बुलेटस्वारांनी या कारवाईचा मोठा धसका घेतला आहे. शाळा, बस स्टँड, गर्दीच्या ठिकाणी सायलेन्सरमधून फटाके फोडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. विशेष मोहीम राबवत ३५ सायलेन्सर जप्त केल्यानं बुलेटस्वरांनी चांगलाच धसका घेतलाय.

सूरज चव्हाणचा झापुक झुपुक येतोय...

मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण याने अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलंय. यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्र आणि मार्तंड देव संस्थानचे विश्वस्तही उपस्थित होते. दरम्यान सूरजचा झापुक झुपुक चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला असून सध्या तो त्याचं प्रमोशन करतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

SCROLL FOR NEXT