Mumbai Fire News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: मुंबईत २१ मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल

Fire News: अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ जंबो टँकरसह स्थानिक पोलीस दाखल झालेत.

Ruchika Jadhav

Mumbai Grant Road Fire News:

मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात असलेल्या धवलगिरी इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या ८ आणि १२ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची महिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ६ जंबो टँकरसह स्थानिक पोलीस दाखल झालेत.

आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग भीषण असल्याने 'लेव्हल २' घोषित करण्यात आले आहे. ८ व्या आणि १२ व्या मजल्यावर आग लागल्याने येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आग लागल्यानंतर काही नागरिक टॅरेसवर पळाले होते.

रहिवासी इमारतीला आग लागल्याने मजल्यावर अडकलेल्या आणि टॅरेसवर अडकलेल्या वक्तींना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेत कुणाला दुखापतही झालेली नाही. ज्या मजल्यावर आगीने पेट घेतला तेथील घरांतील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन्स, फर्निचर, घरगुती वस्तू, दरवाजे सर्वकाही जळून खाक झालं आहे.

मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. अद्यापही अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडताना दिसतायत. काही दिवसांपूर्वीच कांदिवलीमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये २ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

यासह १६ नोव्हेंबर रोजी वाशिममध्ये आगीची घटना घडली होती. देव पेठ येथे डॉक्टर गोरे यांच्या क्लिनिकला भीषण आग लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT