Mumbai Fire News: मुंबईच्या विलेपार्लेमध्ये इमारतीला भीषण आग, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Mumbai Fire News: मुंबईच्या विलेपार्लेमध्ये एका इमारतीला मोठा आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजलीला आग लागल्याची घटना घडली.
Mumbai Fire News:
Mumbai Fire News: Saam tv

संजय गडदे

Mumbai Fire News:

मुंबईच्या विलेपार्लेमध्ये एका इमारतीला मोठा आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजलीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेकडील एका इमारतीला आग लागून त्यात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विलेपार्ले पूर्व भागातील नेहरू रोड वरील न्यू पूनम बाग या इमारतीला मोठी आग लागली.

सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास या इमारतीला आग लागली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग प्रचंड मोठी होती. या आगीत होरपळून 96 वर्षीय हर्षदा बेन पाठक या वृद्धेचा मृत्यू झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Fire News:
Dr BR Ambedkar Death Anniversary: ६ डिसेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

मुंबईच्या विलेपार्ले पूर्वेकडील नेहरू रोडवर न्यू पूनम बाग ही अकरा मजली हायराईज इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. आगीचे लोट प्रचंड असल्याने रहिवाशांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका 96 वर्षीय वृद्ध महिलेला मात्र बाहेर पडणे शक्य झाले नाही.

या आगीत त्या होरपळून जखमी झाल्या. नागरिकांनी त्या महिलेला ताबडतोब विलेपार्ले पश्चिमेकडील महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून त्या वृद्धेला मृत घोषित करण्यात आले आहे.

Mumbai Fire News:
MPSC Exam 2024: तयारीला लागा! एमपीएससीकडून पूर्व परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक जाहीर

आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच

आगीच्या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला कळतात त्वरित आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

यासोबतच अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई पोलीस महानगरपालिकेचे अधिकारी देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत. आग नेमकी कशाने लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरूच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com