manhole Saam Tv (संग्रहित छायाचित्र)
मुंबई/पुणे

Mumbai : नालेसफाई दरम्यान भीषण दुर्घटना! विषारी वायूमुळे एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

Goregaon West drain cleaning worker death : मुंबईतील गोरेगाव पश्चिमेत नालेसफाई दरम्यान विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा साधनांशिवाय कामगारांना नाल्यात उतरवण्यात आल्याचा संशय असून, महापालिका आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Mumbai sewer cleaning accident toxic gas : नालेसफाई सुरू असताना मुंबईतील गोरेगाव पश्चिमेतून एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गोरेगावमधील एका नाल्याची सफाई करण्यासाठी उतरलेल्या दोन कामगारांपैकी एकाचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला आहे, तर दुसरा कामगार गंभीर जखमी आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कामगारांच्या सुरक्षेसाठी जबाबदार कोण? पालिका आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे अजून किती जीव जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम परिसरात गुरूवारी नालेसफाई करण्यात येत होती. नाल्यात साचलेला गाळ काढण्यासाठी २ कामगार मॅनहोलमध्ये खाली उतरले होते. पण नाल्यात तयार झालेल्या अतिविषारी वायूचा (Toxic Gas) फटका बसला. काही वेळातच दोन्ही कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ते बेशुद्ध पडले. स्थानिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने दोघांनाही बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने एका कामगाराचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. जखमी कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा साधनांशिवाय कामगारांना नाल्यात उतरवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नाले सफाई कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT