Ghatkopar Railway Station Crime 
मुंबई/पुणे

मुंबई हादरली! घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतागृहात ६० वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

Ghatkopar Railway Station Crime : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या महिला स्वच्छतागृहात ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

Ghatkopar Railway Station Crime : घाटकोपर रेल्वे स्थानकातील महिला स्वच्छतागृहात ६० वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. आरोपीने महिलेवर अत्याचार केले, त्यानंतर तिला जबर मारहाण केल्याचाही आरोप आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर २५ वर्षाच्या आरोपीला अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानक परिसरातील आणि स्वच्छतागृहाच्या जवळपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना आरोपीची ओळख पटवण्यात यश आले आणि अवघ्या काही वेळातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.

या अत्याचारात जखमी झालेल्या ६० वर्षीय पीडित महिलेला तातडीने उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, घटनेमागचा नेमका तपशील आणि इतर बाबींचा अधिक तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

खडवली येथे राहणारी पीडित महिला घाटकोपरमध्ये रोजंदारीवर काम करते. पीडित महिला गुरुवारी काम संपवून १८ वर्षांच्या मुलीसोबत घरी जाण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकावर आली. मुलगी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थांबली होती, पीडित महिला रात्री ११.१२ वाजता स्वच्छतागृहात गेली. स्वच्छतागृह रिकामे असल्याचा फायदा घेत २० ते २२ वयोगटातील एका तरुणाने आत शिरून दरवाजा आतून बंद केला आणि पॅसेजमध्ये महिलेच्या कपाळावर मारहाण करत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.

रात्री ११.१९ वाजता आरोपी स्वच्छतागृहातून बाहेर पडून घाटकोपर मेट्रोच्या दिशेने पळताना, तर ११.२२ वाजता पीडित महिला बाहेर येताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. पीडितेने आपल्या मुलीला हा प्रकार सांगितल्यानंतर दोघींनी प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील जीआरपी डेस्ककडे धाव घेत मदत मागितली. त्यानंतर स्टेशन व्यवस्थापक, आरपीएफ आणि महिला पोलिसांनी तातडीने चौकशी करत पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. स्थानक व मेट्रो परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandoori Chai Recipe : चहाप्रेमींसाठी खास रेसिपी! हॉटेलसारखा तंदुरी चहा आता घरातच, एक घोट पिताच थंडी जाईल पळून

Maharashtra News Live Update : सकाळी सकाळी पश्चिम रेल्वेला लेटमार्क, ३० मिनिटे उशिराने धावतेय लोकल

Red eyes in the morning: सकाळी झोपेतून उठल्यानंतर डोळे लाल दिसतात? दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' गंभीर आजार

"गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी पवारांना आधार दिला होता"; डिलिमिटेशन बिलावरून काँग्रेसचा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana : आणखी ४५ हजारांहून अधिक 'लाडक्या बहिणी' अपात्र; ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT